धक्कादायक; जावयाच्या अंत्यविधीसाठी निघालेले २६ जण पिकअप अपघातात जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2022 16:35 IST2022-04-20T16:34:54+5:302022-04-20T16:35:00+5:30
औजजवळची घटना : सर्व प्रवासी कारकलचे

धक्कादायक; जावयाच्या अंत्यविधीसाठी निघालेले २६ जण पिकअप अपघातात जखमी
सोलापूर : कर्नाटकातील शिरनाळ येथे जावयाच्या अंत्यविधीसाठी निघालेले कारकल (ता. दक्षिण सोलापूर) येथील २६ जण पिकअप उलटून झालेल्या अपघातात जखमी झाले. ही घटना माळकवठे-औज दरम्यानच्या वळणावर झाली.
दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास कारकलचे नातेवाईक पिकअपमधून अंत्यविधीसाठी निघाले. वाहन माळकवठेच्या पुढे वळणावर आले असता पलटी झाले. अपघाताची माहिती कळताच मंद्रूप पोलीस ठाण्याचे सपोनि नितीन थेटे यांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींना मंद्रूप ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. गंभीर जखमींना सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले. माजी जि. प. सदस्य आप्पाराव कोरे, भाजपचे हणमंत कुलकर्णी, सुधाकर कोरे आदींनी जखमींना उपचारांसाठी नेण्यास मदत केली.
जखमींची नावे अशी, सुरेश बिराजदार, लक्ष्मण मरगूर, लक्ष्मण बिराजदार, महादेव बिराजदार, छायाबाई बिराजदार, संजय बिराजदार, मल्लप्पा बिराजदार, गुरप्पा इंडी, आंदव्वाबाई काळे, काशीनाथ बिराजदार, शांतप्पा बिराजदार, शारदाबाई बिराजदार, संगप्पा उंबरजे, काशीनाथ गुरप्पा बिराजदार, महानंदा बिराजदार, सिध्दगोंडा, शंकरप्पा, पालाक्षी, अशोक, अनिता, सुरेखा, धोंडप्पा बिराजदार, महादेवी गाढवे, मल्लिकार्जुन भोगडे, जयश्री राजमाने, विजयालक्ष्मी उंबरजे.