शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

कौटुंबिक वादाचा रक्तरंजित शेवट; मद्यधुंद मुलाचा वडिलांवर प्राणघातक हल्ला, ७० वर्षीय वृद्धाचा जागीच मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2025 21:00 IST

सोलापुरात कौटुंबिक वादाचा टोकाचा शेवट पाहायला मिळाला असून मुलाने वडिलांचा ठेचून खून केल्याची घटना समोर आली आहे.

Solapur Crime: सोलापूरातील मंगळवेढा तालुक्यातील डोणज  येथे वडील-मुलामधील दीर्घकाळ चाललेल्या कौटुंबिक वादातून धक्कादायक घटना शुक्रवारी संध्याकाळी घडली. शेतातील वाटणी, जनावरे पिकात जाणे तसेच घरात पाणी भरू न देणे, या कारणांवरून झालेल्या भांडणाचा राग मनात धरून मुलानेच जन्मदात्या पित्याच्या डोक्यात दगड घालून निघृण खून केल्याची घटना घडली. याप्रकरणी मंगळवेढा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदला असून, आरोपी काशिनाथ महादेव पुजारी यास अटक केली आहे. महादेव कुसाप्पा पुजारी (वय ७०), असे मयत पित्याचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, १९ डिसेंबर रोजी सायंकाळी ५ ते ७:३० वाजण्याच्या सुमारास डोणज येथील अशोक रामचंद्र मलगोंडे यांच्या पडीक जमिनीत ही घटना घडली. मयत महादेव कुसाप्पा पुजारी (वय ७०) यांचा मुलगा काशिनाथ महादेव पुजारी (४०) याच्याशी शेतवाटप व जनावरांच्या वादावरून वारंवार खटके उडत होते. याच रागातून काशिनाथने वडिलांच्या डोक्यात दगड घालून गंभीर दुखापत केली. उपचारापूर्वीच महादेव पुजारी यांचा मृत्यू झाला.

या घटनेची तक्रार विकास विश्वल कोरे (वय २२, रा. डोणज) यांनी दिली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून मंगळवेढा पोलिस ठाण्यात बीएनएस कलम १०३ (१) अन्वये गुन्हा नोंदला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक दत्तात्रय बोरिगिड्डे यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार बनकर करीत आहेत. या घटनेमुळे डोणज परिसरात खळबळ उडाली आहे.

नशेचा अंमल, वादाची ठिणगी 

आरोपी काशिनाथ पुजारी हा घटनेच्या दिवशी अमावास्येला आरकेरी येथील देवस्थानला जाऊन आला होता. परत घरी आल्यानंतर दारू पिऊन नशेत असतानाच त्याने हे कृत्य केल्याची चर्चा आहे. मुलगा व्यसनाधीन असल्याने मालमत्ता खर्च होऊ नये, या हेतूने वडिलांनी जमीन वाटपास नकार दिला होता, अशी चर्चा गावात रंगली होती.

English
हिंदी सारांश
Web Title : Family feud turns deadly: Drunk son kills father in Solapur.

Web Summary : In Solapur's Donaj, a son fatally attacked his 70-year-old father following a long-standing family dispute over land and livestock. The intoxicated son, Kashinath Pujari, has been arrested. Police are investigating the murder, which has caused shock in the village.
टॅग्स :SolapurसोलापूरCrime Newsगुन्हेगारी