शहरं
Join us  
Trending Stories
1
Leopard Attack: नागपुरात बिबट्याची दहशत! पारडी भागात पहाटे चौघांवर हल्ला; रेस्क्यू ऑपरेशन सुरू
2
मुंबईतील 'त्या' मुलाचा मृत्यू लोकल ट्रेनने धडक दिल्यामुळे नव्हे, तर...; ११ महिन्यांनी उलगडले गूढ
3
पत्नीसोबत Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पाहा डिटेल्स
4
Video: फ्लोरिडामध्ये थरार! धावत्या I-95 हायवेवर विमानाची 'क्रॅश लँडिंग'; भरधाव कारला धडक, थरारक Live Video व्हायरल
5
बायकोशी झालेल्या तुफान वादातून पतीचा 'हाय व्होल्टेज' ड्रामा! पाण्याच्या टाकीवर चढला, पण पुढे काय झालं...
6
Census 2027: मोबाईल ॲप, वेबसाईटवरून माहिती गोळा करणार; 2027च्या जनगणनेबद्दल केंद्र सरकारची महत्त्वाची घोषणा
7
Stock Market Today: शेअर बाजाराची ग्रीन झोनमध्ये सुरुवात, निफ्टीत २५,८०० च्या जवळ; ऑटो, रिअल्टी शेअर्समध्ये खरेदी
8
एकूण ३५० खेळाडूंवर लागणार बोली; आयपीएल लिलाव : २४० भारतीय खेळाडूंचा समावेश
9
कंगाल पाकिस्तानला मदतीचे पैसे मिळवून देणारी अमेरिका स्वत: मोठ्या कर्जात! अर्थव्यवस्थेवर मोठं संकट
10
पाकिस्तानी पत्नीने भारतीय उच्च न्यायलायचे दरवाजे ठोठावले! नेमका वाद काय? का पोहोचली कोर्टात?
11
लव्ह मॅरेज, विश्वासघात अन् कलम ४९८ चा गैरवापर...; विवाहित युवकाने उचललं धक्कादायक पाऊल
12
‘व्होट चोरी’ हे सर्वांत मोठे राष्ट्रविरोधी कृत्य : राहुल; निवडणूक सुधारणांवर चर्चा, ...तर निवडणूक आयुक्तांवर कारवाई
13
Goa Fire: गोवा आग प्रकरणी मोठी कारवाई, लुथरा ब्रदर्सच्या फरार साथीदाराला अटक, मुख्य आरोपी बँकॉकला पसार!
14
पाकिस्तानचे तुकडे होऊन बनणार 'सिंधुदेश'?; लोक रस्त्यावर उतरले, संघर्ष पेटला, ४५ जण अटकेत
15
शेवटचा सत्यशोधक, स्वातंत्र्याचा सूर्य पाहिलेल्या या माणसाने मग अनेकदा अंधारून येतानाही पाहिले
16
भारतीय तांदळावर आणखी टॅरिफ? भारताने आपला स्वस्त तांदूळ अमेरिकेत डम्प करू नये
17
तातडीनं व्याजदर कमी करा; ग्राहकांपर्यंत १.२५% व्याज कपातीचा फायदा पोहोचवा, RBIचा बँकांना स्पष्ट निर्देश
18
शीर कापलेला महिलेचा मृतदेह सापडला, लोकांमध्ये आक्रोश; १६० घरांना लावली आग, भयंकर हिंसाचार
19
Cryptocurrency मधून सरकारची बक्कळ कमाई; वसूल केला ५१२ कोटी रुपयांचा टॅक्स, महाराष्ट्रातून सर्वाधिक योगदान
20
वाघाचा हल्ला, बिबट्याची झडप, भटक्या कुत्र्यांचा चावा विधानसभेत गाजला; मंत्री, आमदार, अधिकाऱ्यांची उपाययोजनेसाठी बैठक
Daily Top 2Weekly Top 5

शिवरायांचा वापर केवळ निवडणुकीसाठी, पूनम महाजन यांचा भाजपला घरचा आहेर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2018 11:25 IST

पंढरपूर येथे पूर्णवाद पॉलिटिकल सायन्स अकादमीच्या वतीने खासदार पूनम महाजन यांना युवक क्रांतिवीर पुरस्कार देऊन गौरविण्यात आले

ठळक मुद्देआपल्या प्रत्येकाला त्रास होतो. तसा त्रास महाजनांना देखील होतो : पूनम महाजनकाही लोक निवडणुकीपुरते गळ्यात जानवे घालतात : पूनम महाजन

पंढरपूर : छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावर हात, कमळ, घड्याळ सगळेच मते मागतात. मात्र छत्रपतींच्या हिंदवी स्वराज्याची व्याख्या आपल्या विचारानुसार मांडतात नव्हे फेकतात. त्यामध्ये घड्याळ, हात आणि कमळाचाही समावेश आहे, असे  प्रतिपादन भाजपा युवा मोर्चाच्या  राष्ट्रीय अध्यक्षा पूनम महाजन यांनी केले. 

पंढरपूर येथे पूर्णवाद पॉलिटिकल सायन्स अकादमीच्या वतीने खासदार पूनम महाजन यांना युवक क्रांतिवीर पुरस्कार देऊन आज गौरविण्यात आले, या कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी माजी आमदार सुधाकरपंत परिचारक, सहकार परिषदेचे अध्यक्ष डॉ. शेखर चरेगावकर, नगराध्यक्षा साधना भोसले, लक्ष्मीकांत पारनेरकर, माजी नगराध्यक्ष लक्ष्मण पापरकर आदी उपस्थित होते. 

यावेळी बोलताना महाजन म्हणाल्या, राजकारणात आपल्या प्रत्येकाला त्रास होतो. तसा त्रास महाजनांना देखील होतो. आपल्या नावापुढे कितीही मोठे आडनाव असले तरी संघर्ष अटळ आहे. काही लोक निवडणुकीपुरते गळ्यात जानवे घालतात मात्र मी खरी जानवेधारी शिवभक्त आहे असे सांगत त्यांनी काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधींवरदेखील टीका केली. 

देशाचे संविधान घेऊन आपल्याला पुढे जायचे आहे. प्रत्येकाला भारतीयत्वाची विचारधारा असावी. आपले हक्क, अधिकार पूर्ण करीत आपल्या देशाचे रक्षण करुया असे आवाहनदेखील त्यांनी यावेळी केले. आपल्या मायमातीचे संरक्षण करणे हे आपले आद्य कर्तव्य असल्याचे पूनम महाजन यांनी सांगितले. शिवरायांचा राजकारणासाठी वापर करण्यात भाजपाही मागे नसल्याचे महाजन यांनी सांगितल्याने ‘छत्रपती का आशीर्वाद चलो चले मोदी के साथ’ या घोषवाक्यालाच एक प्रकारे घरचा आहेर दिल्याची चर्चा कार्यकर्ते आणि पदाधिकाºयांमधून व्यक्त होत होती. मनासारखा मतदारसंघ मिळाला नाही च्२०१४ मध्ये लोकसभा निवडणुकीसाठी ज्या मतदारसंघात काम केले, तो मनासारखा मतदारसंघ मिळाला नाही. ज्या मतदारसंघात कोणी लढायला तयार नव्हते तिथे उमेदवारी मिळाली असल्याचे भाजपा युवा मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्षा पूनम महाजन यांनी सांगितले. 

टॅग्स :SolapurसोलापूरPoonam Mahajanपूनम महाजनPandharpurपंढरपूरBJPभाजपा