सोलापुरात शिवसेनेचा राडा; ठोंगे पाटलांवर हल्ला; गणेश वानकरांवर गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2022 10:55 IST2022-03-29T10:55:00+5:302022-03-29T10:55:05+5:30

युवा सेनेच्या मेळाव्यात राडा : भोईटे, ताकमोगे यांच्यासह इतरांची नावे

Shiv Sena's Radha in Solapur; Attack on Thonge Patal; Crime filed against Ganesh Wankar | सोलापुरात शिवसेनेचा राडा; ठोंगे पाटलांवर हल्ला; गणेश वानकरांवर गुन्हा दाखल

सोलापुरात शिवसेनेचा राडा; ठोंगे पाटलांवर हल्ला; गणेश वानकरांवर गुन्हा दाखल

सोलापूर : युवा सेनेच्या मेळाव्यात माजी शिवसेना जिल्हाप्रमुख लक्ष्मीकांत ठोंगे पाटील यांच्यावर हल्ला करण्यात आला. याप्रकरणी नगरसेवक गणेश वानकर यांच्यासह नऊ जणांविरुद्ध सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना सोमवारी दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास हुतात्मा स्मृती मंदिर येथे झाली.

श्रीकांत राजाराम भोईटे, उमेश ताकमोगे, संदीप हंचाटे, शहाजी भोसले, गणेश वानकर व अन्य दोन ते तीन जण (सर्व रा. सोलापूर) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. या मेळाव्यास युवा सेनेचे प्रदेश सचिव वरुण सरदेसाई, माजी आमदार तानाजी सावंत उपस्थित होते. त्यांच्या आगमनावेळी हुतात्मा स्मृती मंदिर येथे माजी जिल्हा प्रमुख लक्ष्मीकांत ठोंगे पाटील गेले होते. मात्र, नऊ जणांनी त्यांना धक्काबुक्की केली. ठोंगे पाटील यांनी सदर बाजार पोलीस ठाण्यात नऊ जणांविरुद्ध फिर्याद दिली आहे. भादंवि कलम ३२३, १४३, १४७, १४८ प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक प्रशांत क्षीरसागर करीत आहेत.

 

Web Title: Shiv Sena's Radha in Solapur; Attack on Thonge Patal; Crime filed against Ganesh Wankar