Shiv Sena felicitates officers' chair in Gandhigiri style; Because you will be surprised to know | गांधीगिरी पद्धतीने अधिकाऱ्यांच्या खुर्चीचा शिवसेनेकडून सत्कार; कारण जाणून घ्या आश्चर्य व्हाल

गांधीगिरी पद्धतीने अधिकाऱ्यांच्या खुर्चीचा शिवसेनेकडून सत्कार; कारण जाणून घ्या आश्चर्य व्हाल

सोलापूर - केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते कामाचे उद्घाटन झाले मात्र पाच वर्षात कामाला सुरुवात झाली नाही म्हणून शिवसेनेच्या वतीने पंचवर्षं पूर्ती निमित्त अधिकाऱ्यांच्या खुर्चीचा सत्कार करून कामाची आठवण करून देण्यात आली आहे.

26 मार्च 2016 रोजी पाच वर्षांपूर्वी केंद्रीय रस्ते परिवहन मंत्री नितिन गडकरी यांनी सोलापूर येथून ५ हजार कोटी रुपयांच्या रस्ते कामाचे उद्घाटन केलं होते.त्याकामांपैकी एक असणारे टेंभुर्णी शहरातून जाणाऱ्या राज्य मार्ग ९ चे चौपदरीकरण १०७ कोटी रुपये कामाचे उदघाटन देखील झाले होते मात्र ५ वर्षात या कामावर एक पाटी देखील टाकण्यात आली नाही, म्हणून गांधीगिरी पद्धतीने शिवसेना नेते संजय कोकाटे यांनी राष्ट्रीय महामार्ग प्रकल्प संचालक एन.एच.आय सोलापूर अधिकाऱ्यांच्या खुर्चीचा सत्कार केला आहे.यानंतर मुंबई येथील डिजीएम महामार्ग अधिकारी आणि नितीन गडकरी यांचा सत्कार करणार असल्याचे कोकाटे यांनी सांगितलं.

Web Title: Shiv Sena felicitates officers' chair in Gandhigiri style; Because you will be surprised to know

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.