सोलापूर: ३५ हजार मीटरच्या दोऱ्याच्या माध्यमातून साकारली छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा

By आप्पासाहेब पाटील | Updated: February 19, 2026 13:40 IST2026-02-19T13:38:06+5:302026-02-19T13:40:33+5:30

Shiv jayanti 2026: सोलापूर येथील एका प्रतिभावान चित्रकार विपुल मिरजकर याने तब्बल २२ बाय २२ फुटांची भव्य प्रतिमा केवळ दोऱ्याच्या सहाय्याने साकारली आहे.

shiv jayanti 2026 attractive image of Chhatrapati Shivaji Maharaj created using 35,000 meters of rope | सोलापूर: ३५ हजार मीटरच्या दोऱ्याच्या माध्यमातून साकारली छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा

सोलापूर: ३५ हजार मीटरच्या दोऱ्याच्या माध्यमातून साकारली छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा

आप्पासाहेब पाटील, सोलापूर: छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त सोलापूर शहरात उत्साहाचे वातावरण असताना एका आगळ्या वेगळ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या आकर्षक प्रतिमेने सोलापूरकरांचे विशेष लक्ष वेधून घेतले आहे. सोलापूर येथील एका प्रतिभावान चित्रकार विपुल मिरजकर याने तब्बल २२ बाय २२ फुटांची भव्य प्रतिमा केवळ दोऱ्याच्या सहाय्याने साकारली आहे.

'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!

दरम्यान, ही कलाकृती पूर्ण करण्यासाठी जवळपास ८ ते १० दिवसांचा कालावधी लागला आहे. त्यांना पाच सहकाऱ्यांची साथ लाभली असून पारंपरिक चित्रकलेपेक्षा वेगळा प्रयोग करण्याचा उद्देश होता आणि शिवप्रेमींसाठी ही कलाकृती अर्पण करण्यात आल्याचे चित्रकार विपुल मिरजकर यांनी लोकमत शी बोलताना सांगितले. शिवजन्मोत्सव मध्यवर्ती मित्र मंडळ आणि सुभाष गुरुजी पवार यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात आला. शिवजन्मोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ही भव्य प्रतिमा शहरातील श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे महाराजांच्या पुतळ्याजवळ लावण्यात आली आहे. त्यामुळे चौकात येणाऱ्या नागरिकांचे आणि शिवप्रेमींचे लक्ष वेधले जात असून अनेकजण या कलाकृतीसोबत छायाचित्रेही काढत आहेत.

Web Title : सोलापुर: 35 हजार मीटर धागे से बनी छत्रपति शिवाजी महाराज की छवि

Web Summary : सोलापुर में कलाकार विपुल मिरजकर ने 35 हजार मीटर धागे का उपयोग करके 22x22 फीट की छत्रपति शिवाजी महाराज की छवि बनाई। शिवजन्मोत्सव मंडल के सहयोग से बने इस कलाकृति को पूरा करने में 10 दिन और पांच सहायकों की मदद लगी। यह शिवाजी महाराज चौक प्रतिमा के पास प्रदर्शित है।

Web Title : Solapur: Shivaji Maharaj Image Created with 35,000 Meters of Thread

Web Summary : Artist Vipul Mirajkar created a 22x22 ft Shivaji Maharaj image using 35,000 meters of thread in Solapur. The artwork, a collaboration with Shivjanmotsav Mandal, took 10 days and five assistants to complete. It's displayed near Shivaji Maharaj Chowk statue.