शरद पवारांचा सोलापूर दौरा पुन्हा रद्द; माढ्यातील शेतकरी मेळाव्याला हजेरी लावणार! 

By राकेश कदम | Updated: November 15, 2023 10:15 IST2023-11-15T10:13:24+5:302023-11-15T10:15:03+5:30

शरद पवार गुरुवारी केवळ माढा तालुक्यातील कापसेवाडी येथील शेतकरी मेळाव्याला हजेरी लावणार आहेत.

Sharad Pawar's Solapur tour canceled again; Farmers in Madha will attend the gathering! | शरद पवारांचा सोलापूर दौरा पुन्हा रद्द; माढ्यातील शेतकरी मेळाव्याला हजेरी लावणार! 

शरद पवारांचा सोलापूर दौरा पुन्हा रद्द; माढ्यातील शेतकरी मेळाव्याला हजेरी लावणार! 

सोलापूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा सोलापूर आणि पंढरपूर दौरा पुन्हा रद्द झाला आहे. शरद पवार गुरुवारी केवळ माढा तालुक्यातील कापसेवाडी येथील शेतकरी मेळाव्याला हजेरी लावणार आहेत. पंढरपूर दौऱ्याची तारीख लवकरच ठरेल, असे राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष भारत जाधव यांनी सांगितले.

सिद्धेश्वर सहकारी बँकेचा सुवर्ण महोत्सवी वर्ष उद्घाटन कार्यक्रम आणि सोलापूर लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित बैठकीसाठी शरद पवार गुरुवारी सकाळी साडेदहा वाजता सोलापुरात येणार होते. यादरम्यान महाविकास आघाडीतील पक्षांची बैठक व्हावी यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून प्रयत्न सुरू होते. परंतु पवारांचा दौरा रद्द झाला आहे. 

माढा तालुक्यातील कापसेवाडी येथे गुरुवारी सकाळी साडेदहा वाजता शेतकऱ्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला पवार आवर्जून हजेरी लावणार आहेत. पवार बारामती वरून हेलिकॉप्टरने कापसेवाडी येथे येतील. पुन्हा बारामती ला जातील असे भारत जाधव यांनी सांगितले.

Web Title: Sharad Pawar's Solapur tour canceled again; Farmers in Madha will attend the gathering!