शरद पवारांची सोलापूरकरांना मदत; कोरोनाबधितांसाठी दिले ७५ रेमडेसिविर इंजेक्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2021 18:02 IST2021-04-11T17:55:19+5:302021-04-11T18:02:58+5:30
सोलापूर लोकमत ब्रेकिंग

शरद पवारांची सोलापूरकरांना मदत; कोरोनाबधितांसाठी दिले ७५ रेमडेसिविर इंजेक्शन
सोलापूर : सोलापुरात सध्या रेमडेसिविर इंजेक्शनचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे हाल होत आहेत.
रेमडेसिविर इंजेक्शन मिळविण्यासाठी गरीबांना दिवस दिवसभर पायपीट करावी लागत आहे. याची दखल घेत राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार यांनी सोलापूरसाठी 75 रेमडेसिविर इंजेक्शन पाठवून दिले आहेत.
राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी वेल्फेअर फंडाच्या माध्यमातून हे इंजेक्शन देण्यात आले. सोलापूर शहरातील गरीब आणि गरजू नागरीकांना हे इंजेक्शन देण्यात येणार आहेत. सध्या या इंजेक्षनच्या देखरेखेसाठी जिल्हाधिकारी यांनी समिती स्थापन केली आहे त्या समितीकडे हे इंजेक्शन येणार असल्याची माहिती देण्यात आली.
या अगोदरही गेल्या वर्षी शरद पवार यांनी सोलापूरकरांसाठी रेमडेसिविर इंजेक्शन पाठवून दिले होते. शरद सोलापूरवर विषेश प्रेम आहे. सोलापुुरात प्रत्येक घडामोडीवर शरद पवार यांचे लक्ष असते दुष्काळ असो अथवा इतर आपत्ती. सोलापूरला मदत मिळवून देण्यासाठी पवार हे नेहमीच अग्रेसर राहिले आहेत. आताही सोलापूरकरांच्या मदतीला पवार धावून आल्याचे दिसते.