शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
5
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
6
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
7
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
8
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
9
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
10
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
11
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
12
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
13
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
14
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
15
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
16
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
17
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

शरद पवारांनी आंबेडकर चळवळीची एक पिढी बरबाद केली; आनंदराज आंबेडकर यांची टीका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2019 20:26 IST

काही लोक स्वत:ला देवाच्या पातळीवर घेऊन जात आहेत. स्वत:ला देव समजत आहेत. परंतु स्वत:ला देव समजणारे लोक जेलमध्ये बसले आहेत. देव समजणाºया जयसिद्धेश्वर यांना मानसोपचाराची गरज आहे.

ठळक मुद्देसोलापूर लोकसभा निवडणुकीत बहुजन वंचित आघाडीचे उमेदवार अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या प्रचारार्थ त्यांचे बंधू आनंदराज आंबेडकर हे पंढरपुरातनिवडणुकीच्या निकालानंतर छोट्या पक्षांची भूमिका निर्णायक ठरणार असल्याचे मत आनंदराज आंबेडकर यांनी व्यक्त केले.

पंढरपूर : शरद पवार यांनी चुकीच्या नेत्याला पुढे आणून आंबेडकर चळवळीची एक पिढी बरबाद केली. त्यामुळे चळवळ मागे पडली आणि ‘तो’ नेताही पवारांच्या आता जवळ नाही. तसेच सोलापूर येथील पवारांची सभा ही केविलवाणी झाली. ज्या सेनापतींनी रिंगणातून पळ काढला त्याबद्दल काय बोलणार?  अशी टीका आनंदराज आंबेडकर यांनी शरद पवार यांच्यावर केली.

सोलापूर लोकसभा निवडणुकीत बहुजन वंचित आघाडीचे उमेदवार अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या प्रचारार्थ त्यांचे बंधू आनंदराज आंबेडकर हे पंढरपुरात आले होते, तेव्हा त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

जयसिद्धेश्वर यांच्यावर टीका करताना आंबेडकर म्हणाले, काही लोक स्वत:ला देवाच्या पातळीवर घेऊन जात आहेत. स्वत:ला देव समजत आहेत. परंतु स्वत:ला देव समजणारे लोक जेलमध्ये बसले आहेत. तसेच देव समजणाºया जयसिद्धेश्वर यांना मानसोपचाराची गरज आहे, असे सांगितले.

उत्तर प्रदेशामध्ये भाजपला विरोध म्हणून सपा आणि बसपा एकत्र आले. यामध्ये काँग्रेसने पण सामील होणार असे वाटले. मात्र यापासून वेगळे राहून सर्व जागांवर उमेदवार उभे केले. याचा फायदा निवडणुकीत भाजपला होणार आहे़ यावरून काँग्रेसच भाजपची ‘ए’ टीम आहे, अशी टीका त्यांनी केली.

तसेच काँग्रेसचा जाहीरनामा हा निवडणुकीचा जुमला आहे, अशी टीका त्यांनी केली. राज्यात या निवडणुकीत चमत्कार होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 

यंदाची निवडणूक ही घराणेशाही, धार्मिकता याविरुद्ध आहे. निवडणुकीच्या निकालानंतर छोट्या पक्षांची भूमिका निर्णायक ठरणार असल्याचे मत आनंदराज आंबेडकर यांनी व्यक्त केले.

सोलापूरचा पाणी प्रश्न शिंदे सोडवू शकले नाहीत सुशीलकुमार शिंदे यांनी राज्याचे मुख्यमंत्री, राज्यातील विविध खात्यांचे मंत्री, केंद्रात मंत्री पद उपभोगले.  मात्र सोलापूरच्या जनतेचा जिव्हाळ्याचा पाणीप्रश्न सोडवू शकले नाहीत. एवढ्या मोठ्या लोकसंख्येच्या शहरात आठ दिवसांतून एकदा पाणी येते हे दुर्दैव आहे, अशीही टीका यावेळी आनंदराज आंबेडकर यांनी सुशीलकुमार शिंदे यांच्यावर केली.

काँग्रेसच भाजपची ‘ए’ टीम - उत्तर प्रदेशामध्ये काँग्रेसने सपा आणि बसपा बरोबर आघाडी न करता सर्व ठिकाणी उमेदवार उभे केले. यामुळे उलट याचा फायदा भाजपलाच होणार आहे़ त्यामुळे काँग्रेसचे नेते जर वंचित आघाडीला भाजपची ‘बी’ टीम म्हणत असतील तर काँग्रेसच खºया अर्थाने भाजपची ‘ए’ टीम आहे, अशी  टीकाही आनंदराज आंबेडकर यांनी बोलताना शेवटी केली़

टॅग्स :SolapurसोलापूरLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकsolapur-pcसोलापूरmadha-pcमाढाPrakash Ambedkarप्रकाश आंबेडकर