शरद पवार यांच्या गटाकडून राष्ट्रवादी युवक काॅंग्रेसचे सात पदाधिकारी बडतर्फ
By राकेश कदम | Updated: July 3, 2023 18:47 IST2023-07-03T18:47:02+5:302023-07-03T18:47:54+5:30
राज्याच्या विद्यमान सरकारमध्ये सामील हाेणाऱ्या व उपमुख्यमंत्री, मंत्रीपदाची शपथ घेतलेल्या पक्षाच्या आमदारांना जे पदाधिकारी समर्थन देतील त्यांना बडतर्फ करण्यात येईल असे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी म्हटले हाेते.

शरद पवार यांच्या गटाकडून राष्ट्रवादी युवक काॅंग्रेसचे सात पदाधिकारी बडतर्फ
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासाेबत जाणाऱ्या नेत्यांच्या बडतर्फीचे राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या गटाकडून कायम आहे. साेमवारी सायंकाळी राष्ट्रवादी युवक काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनी साेलापूरचे युवक अध्यक्ष जुबेर बागवान, प्रदेश सचिव श्रीकांत शिंदे (पंढरपूर) यांच्यासह सात जणांना बडतर्फ केल्याचे पत्रक काढले.
राज्याच्या विद्यमान सरकारमध्ये सामील हाेणाऱ्या व उपमुख्यमंत्री, मंत्रीपदाची शपथ घेतलेल्या पक्षाच्या आमदारांना जे पदाधिकारी समर्थन देतील त्यांना बडतर्फ करण्यात येईल असे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी म्हटले हाेते. सायंकाळपर्यंत या लाेकांनी निर्णय कळवावा असेही पाटील यांनी म्हटले हाेते. यादरम्यान युवक काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनी सात जणांना बडतर्फ केल्याचे पत्रक काढले. यात साेलापूर युवक अध्यक्ष जुबेर बागवान, जळगाव युवक अध्यक्ष रविंद्र पाटील, बीड युवक अध्यक्ष विजयसिंह बांगर, नाशिक युवक जिल्हाध्यक्ष अविनाश धायगुडे, युवक प्रदेश सरचिटणीस जगदीश पंचबुध्दे, युवक प्रदेश सचिव श्रीकांत शिंदे यांचा समावेश आहे.