Kirit Somaiya किरीट साेमय्या यांची रवानगी तुरुंगात करा; काॅंग्रेसची मागणी, फाेटाेला जाेडे मारत आंदाेलन
By राकेश कदम | Updated: July 18, 2023 13:20 IST2023-07-18T12:28:25+5:302023-07-18T13:20:47+5:30
Kirit Somaiya News किरीट साेमय्या यांचा एक आक्षेपार्ह व्हिडिओ साेमवारी साेशल मिडीयावर व्हायरल झाला.

Kirit Somaiya किरीट साेमय्या यांची रवानगी तुरुंगात करा; काॅंग्रेसची मागणी, फाेटाेला जाेडे मारत आंदाेलन
साेलापूर : भाजपचे माजी खासदार किरीट साेमय्या Kirit Somaiya यांच्यावर गुन्हा दाखल करावा. त्यांची रवानगी तुरुंगात करा, अशी मागणी करीत शहर काॅंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी आंदाेलन केले.
किरीट साेमय्या यांचा एक आक्षेपार्ह व्हिडिओ साेमवारी साेशल मिडीयावर व्हायरल झाला. साेमय्या यांचा निषेध करण्यासाठी काॅंग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नराेटे आणि कार्यकर्ते मंगळवारी सकाळी काॅंग्रेस भवनात जमले. किरीट साेमय्या यांच्या चेहऱ्यावर फूली मारलेले फाेटाे दाखवित कार्यकर्त्यांनी निदर्शने केली. महिला पदाधिकाऱ्यांनी या फाेटाेला जाेडे मारले.
यावेळी महिला अध्यक्ष प्रमिला तुपलवंडे, कार्याध्यक्ष मनोज यलगुलवार, प्रदेश चिटणीस किसन मेकाले, नरसिंह आसादे, विनोद भोसले, दत्तू बंदपट्टे, फिरदाेस पटेल, हेमा चिंचोळकर, सेवादल अध्यक्ष भीमाशंकर टेकाळे, अंबादास करगुळे, देवा गायकवाड, बाबूराव म्हेत्रे, सुमन जाधव, शोभा बोबे, महेश लोंढे, अंजली मंगोडेकर, लता गुंडला, मीरा घटकांबळे, अरुणा बेंजरपे, अशोक कलशेट्टी, तिरुपती परकीपंडला, प्रवीण वाले, विवेक कन्ना आदी उपस्थित हाेते.
भाजप नेते गप्प का? : नराेटे
नराेटे म्हणाले, भाजप नेते किरीट साेमय्या यांनी आजवर विराेधी पक्षाच्या नेत्यांवर खाेटेनाटे आराेप करुन बदनाम केले. भाजप सरकारने त्यांच्यावर विश्वास ठेवून विराेधी पक्षाच्या नेत्यांना तुरुंगात टाकले. साेमय्या यांचा आक्षेपार्ह व्हिडिओ समाेर आल्यानंतर भाजप नेते गप्प आहेत. भाजपच्या अनेक नेत्यांचे असे व्हिडिओ समाेर आले आहेत. भाजपने महिलांची माफी मागायला हवी. साेमय्या यांना तुरुंगात टाकायला हवे.