महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या समितीवर सोलापूरच्या तिघांची निवड

By Appasaheb.patil | Updated: March 3, 2023 17:28 IST2023-03-03T17:27:45+5:302023-03-03T17:28:06+5:30

रोहित जाधव यांनी यापूर्वी सलग तीन वर्ष महाराष्ट्र राज्य रणजी संघातून प्रतिनिधीत्व केले आहे.

Selection of Solapur trio on Maharashtra Cricket Association committee | महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या समितीवर सोलापूरच्या तिघांची निवड

महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या समितीवर सोलापूरच्या तिघांची निवड

सोलापूर : महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या निवड समितीवर दोघांची तर टॅलेंट हंट समितीवर एकाची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती संघटनेचे सेक्रेटरी चंद्रकांत रेम्बुर्स यांनी सांगितले. रणजी क्रिकेट स्पर्धेसाठीच्या समितीवर रोहित जाधव, १९ वर्षाखालील मुलींचे संघ निवडण्याच्या समितीवर स्नेहल जाधव तर टॅलेंट हंट समितीवर  शिवानंद अकलूजकर यांची निवड करण्यात आली. 

रोहित जाधव यांनी यापूर्वी सलग तीन वर्ष महाराष्ट्र राज्य रणजी संघातून प्रतिनिधीत्व केले आहे. एक दिवसीय रणजी सामन्यासाठी रणजी संघातून प्रतिनिधीत्व केले आहे. स्नेहल जाधव हिने पश्चिम भारतीय महिला क्रिकेट संघात प्रतिनिधीत्व केले आहे. महाराष्ट्र महिला संघातून टी २०, वन-डे, दोन व तीन दिवसीय सामन्यात प्रतिनिधीत्व केले आहे. सध्या भारताच्या १९ वर्षाखालील संघात सराव शिबीरासाठी ती रवाना झाली आहे. शिवा अकलूजकर यांनी भारतीय रेल्वे संघाकडून रणजी क्रिकेट स्पर्धेत प्रतिनिधीत्व केले आहे.

महाराष्ट्र क्रिकेट संघाकडून १५ व १९ वर्षाखालील गटाचे उपकर्णधार व कर्णधार पदाची जबाबदारी स्वीकारली होती. विद्यापीठ संघातूनही त्यांनी चांगली कामगिरी केली आहे. या निवडीचे जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे चेअरमन रणजितसिंह मोहिते-पाटील, अध्यक्ष दिलीप माने, संघटनेचे अन्य पदाधिकारी, सदस्य व खेळाडूंनी कौतुक केले आहे.

Web Title: Selection of Solapur trio on Maharashtra Cricket Association committee