तालुका समन्वयकपदी चौघांची निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2021 04:16 AM2021-06-22T04:16:21+5:302021-06-22T04:16:21+5:30

कासेगाव येथे सोयाबीन वाटप सोलापूर : दक्षिण सोलापूर तालुक्यात कासेगाव येथे राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत तूर व सोयाबीन वाटप ...

Selection of four as taluka coordinators | तालुका समन्वयकपदी चौघांची निवड

तालुका समन्वयकपदी चौघांची निवड

googlenewsNext

कासेगाव येथे सोयाबीन वाटप

सोलापूर : दक्षिण सोलापूर तालुक्यात कासेगाव येथे राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत तूर व सोयाबीन वाटप करण्यात आले. प्रत्येकी तूर दोन किलो, तर सोयाबीन बारा किलो वाटप करण्यात आले. यावेळी उपसरपंच शंकर वाडकर, ग्रामसेवक आय. एम, पठाण, कृषी सहायक मदन माने, ग्रामपंचायत सदस्य मदन माने, निशिकांत पाटील, विक्रम मिटकरी, प्रवीण चौगुले, ज्ञानेश्वर रोकडे उपस्थित होते.

माेहोळमध्ये एक घर, एक झाड उपक्रम

मोहोळ : तालुक्यात नजीक पिंपरी येथे राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जन्मोत्सव मंडळ व राजामाता प्रतिष्ठान सामाजिक संस्था यांच्यावतीने एक घर, एक झाड हा उपक्रम राबविण्यात आला. गावात घरोघरी जाऊन ५०० केशर आंब्यांची रोपे लावली. त्यांच्या संगोपणाची जबाबदारी तेथील कुटुंबांना देण्यात आली. यावेळी मंडळाचे संस्थापक दिलीप पाटील, सरपंच वर्षा सरवदे, उपसरपंच युवराज पाटील, सुनील पाटील, फुलचंद सरवदे, अभिमान सरवदे, सूर्यगुप्त गरड, विठ्ठल पाटील, यल्लप्पा सलगर, उत्तम मेटकरी, बिरुदेव खरात, बालाजी वाघमोडे, आकाश गरड, महादेव वाघमोडे, योगेश पाटील, शिवाजी वाघमोडे, बालाजी मेटकरी उपस्थित होते.

Web Title: Selection of four as taluka coordinators

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.