शहरं
Join us  
Trending Stories
1
मनुस्मृतीतील काही भाग अभ्यासक्रमात?; पवारांचे आरोप, फडणवीसांचं आक्रमक प्रत्युत्तर
2
भारताच्या अनेक चेक पॉईंटवर चीनचा कब्जा, केंद्र सरकारचं मौन, शशी थरूर यांचा आरोप
3
"मला फेमस व्हायचं होतं म्हणून...", पुणे अपघातातील 'बाळा'च्या कथित व्हिडिओचे सत्य आले समोर
4
Kangana Ranaut : "काँग्रेसने कंगना राणौतचा अपमान केला..."; पंतप्रधान मोदींचा जोरदार घणाघात
5
Trent Boultचा भेदक मारा, सनरायझर्स हैदराबादला ३ धक्के! काव्या मारनचा पडला चेहरा
6
"महाराष्ट्रातील उद्योग इतर राज्यात पळवले जात असताना शिंदे सरकार काय करतंय?", विजय वडेट्टीवार यांचा सवाल
7
नर्मदा बचाओ आंदोलनाच्या प्रमुख मेधा पाटकर 20 वर्षे जुन्या मानहानीच्या प्रकरणात दोषी
8
थोडी जरी नैतिकता असेल तर राजीनामा द्या; रोहित पवारांचा फडणवीस, अजितदादांवर हल्लाबोल
9
केदारनाथ मध्ये मोठा हेलिकॉप्टर अपघात टळला, चालकाच्या प्रसंगावधानामुळे वाचले प्रवाशांचे प्राण 
10
अल्पसंख्याक महिला करायची योगींचं समर्थन, अचानक गुंडांनी घरात घुसून केली मारहाण, त्यानंतर...
11
तंत्रज्ञानाची कमाल! WhatsApp चं सीक्रेट फीचर; एका कोडने 'गायब' होतील चॅट्स
12
विराट कोहलीची RCBच्या चाहत्यांसाठी सोशल मीडियावर विशेष पोस्ट, म्हणाला- "नेहमीप्रमाणे..."
13
भरधाव कारने दिली धडक; 20 फूट हवेत फेकला गेला तरुण; थरकाप उडवणारं CCTV फुटेज
14
ढेर 'सारा' प्यार! सचिन तेंडुलकरने लेक पास झाल्याची बातमी जगाला सांगितली
15
भारतीय क्रिकेट संघासाठी नवा प्रशिक्षक का मिळत नाही? सहा कारणं, ज्याचा विचार व्हायला हवा!
16
अजय देवगणच्या या सिनेमातून सोनाक्षी सिन्हाचा पत्ता कट! मराठमोळ्या अभिनेत्रीची एन्ट्री
17
पुण्यानंतर मुंबईतही तेच! अल्पवयीन मुलानं बेदरकारपणे बाइक चालवत घेतला एकाचा जीव
18
एकाच कुटुंबातील ६ जणांनी एकाच वेळी कापली हाताची नस, एक जण मृत्युमुखी, ५ गंभीर, समोर आलं धक्कादायक कारण 
19
"आचार संहितेचे बहाणे करू नका, तातडीने उपाययोजना करा", नाना पटोलेंची सरकारकडे मागणी
20
निवडणूक संपताच शिंदे गटात वादाचे फटाके; "गजानन किर्तीकरांवर कारवाई झाली तर..."

मृतदेह पाहून जिथं नातेवाईक पळ काढतात; अंत्यसंस्कारासाठी यांचेच हात पुढे येतात !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2020 11:21 AM

सोलापुरातील शववाहिका चालकांचे योगदान; अहोरात्र बजावतात सेवा बजाविणारे योध्दे

ठळक मुद्देमहापालिकेच्या आयडीएच हॉस्पिटलमधून शववाहिका आणि रुग्णवाहिकेची सेवा दिली जातेसिव्हिल आणि खासगी हॉस्पिटलमध्ये मरण पावलेल्या कोरोनाबाधित रुग्णांचे मृतदेह स्मशानात नेण्याची जबाबदारी सहा चालकांवरपरिवहन खाते डबघाईला आल्यानंतर यांची शववाहिकेवर नेमणूक करण्यात आली

राकेश कदम 

सोलापूर : कोरोनामुळे घरातला माणूस मेला तर सर्वांनाच दु:ख होतं. पण स्मशानभूमीत गेल्यावर नातेवाईकही धजावत नाहीत. तिथे महापालिकेच्या शववाहिकेचे सहा कर्मचारी ड्रायव्हरच्या भूमिकेतून नातेवाईकांच्या भूमिकेत येतात. प्रकाश चंदनशिवे, ज्ञानेश्वर लांबतुरे, गोविंद देवडे, शैलेंद्रसिंह कय्यावाले, धोंडिबा लवटे, बाबुराव हणमशेट्टी अशी त्यांची नावे.

महापालिकेच्या आयडीएच हॉस्पिटलमधून शववाहिका आणि रुग्णवाहिकेची सेवा दिली जाते. सिव्हिल आणि खासगी हॉस्पिटलमध्ये मरण पावलेल्या कोरोनाबाधित रुग्णांचे मृतदेह स्मशानात नेण्याची जबाबदारी या सहा चालकांवर आहे. त्यांना कामाच्या वेळाही ठरवून दिल्या आहेत. 

कोरोनाचा पहिला बळी ठरलेला तेलंगी पाच्छापेठेतील दुकानदाराचा मृतदेह प्रकाश चंदनशिवे (वय ५७) आणि ज्ञानेश्वर लांबतुरे (वय ५४) यांनीच सिव्हिलमधून कब्रस्तानात आणला होता. त्यानंतर चार दिवसांनी आणखी एकाचा मृत्यू झाला. त्यावर विद्युत दाहिनीत अंत्यसंस्कार करण्यात आले. ड्रायव्हर आणि मृतदेह यांच्यात कोणत्याही प्रकारचे पार्टिशन नव्हते. तोंडाला मास्क, हातात मोजे होते. पीपीई किट नव्हते. पण भीती वाटली नाही, असे चंदनशिवे सांगतात. धोंडिबा लवटे, देवडे (वय ५६), हणमशेट्टी, लांबतुरे हे चार जण परिवहन उपक्रमाच्या सेवेत होते. परिवहन खाते डबघाईला आल्यानंतर यांची शववाहिकेवर नेमणूक करण्यात आली. दहा वर्षात बरे-वाईट अनुभव आले. पण कोरोना अनुभव विदारक असल्याचे धोंडिबा लवटे (वय ५१) सांगतात. 

कोरोनाचा रिपोर्ट यायला दोन ते तीन दिवस लागतात. तोपर्यंत मृतदेह पडून असतो. मृतदेहाचे वजन वाढलेले असते. स्मशानातल्या लोकांना उचलणे अवघड जाते. नातेवाईक नसले की आम्हालाच हा मृतदेह उतरवून घ्यावा लागतो. बाबुराव हणमशेट्टी (वय ५७) म्हणतात की, शववाहिकेवर काम करायची इच्छा पूर्वीपासूनच नाही. पण सिटी बस बंद आहे. पगारही वेळेवर होत नाही. मी सुद्धा आणखी एक वर्षानंतर निवृत्त होईन. 

एक वर्ष काढायचे म्हटले तर हे कोरोनाचे संकट आले. जीव धोक्यात घालून काम करतोय याची जाणीव आहे. पण एकदा काम करायचे ठरवले म्हटले तर पूर्ण करावेच लागेल.

मृतदेहाचे तुकडे गोळा केले, कोरोना काय करणार !- कोरोनाची भीती वाट नाही का?, असे विचारल्यावर चंदनशिवे, लांबतुरे यांच्यासह सर्व जणांनी गेल्या दहा वर्षातील अनुभव कथन केले. प्रकाश चंदनशिवे म्हणाले, गेल्या दहा वर्षात आम्ही रेल्वेच्या ट्रॅकवर पडलेले तुकडे गोळा केलेत. विहिरीमध्ये पडलेले मृतदेह बाहेर काढायला मदत केली. अपघातात छिन्नविच्छिन्न झालेले मृतदेह आणले. सोलापुरातून उत्तर प्रदेश, कोलकाता भागात मृतदेह घेऊन गेलोय. मृतदेहाच्या बाजूला बसून गाडीतच जेवण केलंय. गाडीतच झोपलोय. कोरोना होऊ नये म्हणून आम्ही काळजी घेतोय. पण हा कोरोना तर आमचे काय करणार आहे?

मुलाचा वाढदिवस विसरून गेलो- लांबतुरे म्हणाले, गेल्या तीन महिन्यात आमच्या स्मशानात दररोज चार ते पाच फेºया होतात. घरातल्या माणसांकडे बघायला वेळ नाही. ४ मे रोजी मुलाचा वाढदिवस होता. तो घरात वाट बघत बसला होता. स्मशानातल्या फेºयांच्या नादात मी वेळेवर घरी जायचे विसरून गेलो होतो

टॅग्स :Solapurसोलापूरcorona virusकोरोना वायरस बातम्याDeathमृत्यू