शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

टेंभुर्णीजवळ ऊसतोड मजुरांच्या दुचाकीला धडक; तिघांचा जागीच मृत्यू, दोघे जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2019 11:02 IST

टेंभुर्णी:  पुणे- सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर ऊसतोड मजुरांच्या मोटर-सायकलला पाठीमागून आलेल्या कारने जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात तिघेजण जागीच ठार ...

ठळक मुद्देहिशोब पाहण्यासाठी ते सर्वजण माढा तालुक्यातील आलेगाव बुद्रुक कारखाना कार्यस्थळावर गेले होतेजखमीपैकी एकाची प्रकृती चिंताजनक आहे. हा अपघात महामार्गावरील शिराळ (टें)(ता.माढा) पाटीजवळ रात्री ७.३० वाजण्याच्या सुमारास घडला

टेंभुर्णी:  पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर ऊसतोड मजुरांच्या मोटर-सायकलला पाठीमागून आलेल्या कारने जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात तिघेजण जागीच ठार झाले असून दोघे जखमी झाले. जखमीपैकी एकाची प्रकृती चिंताजनक आहे. हा अपघात महामार्गावरील शिराळ (टें)(ता.माढा) पाटीजवळ रात्री ७.३० वाजण्याच्या सुमारास घडला.

मृतांमध्ये पती-पत्नी व दहा वर्षांचा नातू यांचा समावेश आहे. मयत व जखमी एकाच कुटुंबातील असून उंडेगाव (ता. परांडा,जि. उस्मानाबाद) येथील रहिवासी आहेत. नवनाथ उगाजी गायकवाड (वय-५५), पत्नी अलका नवनाथ गायकवाड (वय-४५), नातू सूरज उर्फ काळू किरण कांबळे (वय-१०) सर्व (रा.उंडेगाव ता.परांडा,जि.उस्मानाबाद) अशी मयतांची नावे आहेत. अक्षय नवनाथ गायकवाड (वय-२७) व गिरज किरण कांबळे (वय-८ दोघे रा. उंडेगाव) हे दोघे जखमी असून यातील गिरज किरण कांबळे याची प्रकृती चिंताजनक आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की,यातील मयत व जखमी हे सर्वजण भैरवनाथ शुगर आलेगाव या कारखान्याकडे भिवा विठ्ठल चौधर (रा.गीतेवाडी ता.जामखेड) या मुकादमच्या ट्रॅक्टरवर ऊस तोडणी मजूर म्हणून काम करत होते. सुर्ली येथे राहत होते. दोनच दिवसापूर्वी कारखाना बंद झाला होता. त्यानंतर उद्या हे सर्वजण गावी जाणार होते.

हिशोब पाहण्यासाठी ते सर्वजण माढा तालुक्यातील आलेगाव बुद्रुक कारखाना कार्यस्थळावर गेले होते. ते सर्वजण सुर्लीकडे मोटारसायकल वरून सायंकाळी ७.३० वा.च्या सुमारास महामार्गावरून शिराळ टे येथे महामार्ग ओलांडून पुढे जाताना पाठीमागील कारने (एम. एच. १३-बी. एन. ९९५१) त्यांच्या मोटारसायकलला  (एम. एच. २५-ए. ई. ९१७) पाठीमागून जोरदार धडक दिली. यामध्ये अलका नवनाथ गायकवाड, नवनाथ सयाजी गायकवाड हे पती-पत्नी  व नातू सुरज किरण कांबळे मयत झाले . गिरीज कांबळे याच्यावर इंदापूर येथे तर अक्षय गायकवाड याच्यावर टेंभुर्णी येथे उपचार चालू आहेत.

टॅग्स :SolapurसोलापूरAccidentअपघातSugar factoryसाखर कारखानेFarmerशेतकरीagricultureशेती