हातोड्याने तोडली मूर्तिकाराची बरगडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2021 04:17 AM2021-01-10T04:17:07+5:302021-01-10T04:17:07+5:30

पंढरपूर : मूर्ती बनविणाऱ्या एका कलाकाराची बरगडी हातोड्याने मारून तोडल्याचा प्रकार पुढे आला आहे. राजेंद्र मच्छिंद्र धोत्रे (रा. दाळे ...

The sculptor's rib broke with a hammer | हातोड्याने तोडली मूर्तिकाराची बरगडी

हातोड्याने तोडली मूर्तिकाराची बरगडी

Next

पंढरपूर : मूर्ती बनविणाऱ्या एका कलाकाराची बरगडी हातोड्याने मारून तोडल्याचा प्रकार पुढे आला आहे.

राजेंद्र मच्छिंद्र धोत्रे (रा. दाळे गल्ली, पंढरपूर), असे जखमी मूर्तिकाराचे नाव असून, शुक्रवारी रात्री साडेनऊच्या सुमारास पंढरपूर शहरात दाळे गल्ली येथे हा प्रकार घडला.

पोलीस सूत्रांकडील मिळालेल्या माहितीनुसार अंबादास बाबूराव धोत्रे, अशोक चौगुले, किशोर अशोक चौगुले (सर्व रा. दाळेगल्ली, पंढरपूर) हे तिघे जण राजेंद्र मच्छिंद्र धोत्रे यांच्या घरासमोर आले. त्यानंतर त्या तिघांनी राजेंद्र मच्छिंद्र धोत्रे यांना शिवीगाळ करीत हातोड्याने मारून बरगडी तोडली. काठीने डोक्यात मारहाण केली. राजेंद्र धोत्रे यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तिघांनी संगनमत करून मारहाण केल्याची फिर्याद राजेंद्र धोत्रे यांनी पोलिसांत दिली आहे. अधिक तपास हेडकॉन्स्टेबल वाघमोडे करीत आहेत.

Web Title: The sculptor's rib broke with a hammer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.