शाळकरी मुलीचा पाठलाग करुन विनयभंग; दोघांविरुद्ध गुन्हा
By शीतलकुमार कांबळे | Updated: November 18, 2023 18:10 IST2023-11-18T18:10:01+5:302023-11-18T18:10:30+5:30
अश्लील वर्तन करणारा व त्याला मदत करणारा अशा दोघांंविरुद्ध फौजदार चावडी पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा नोंदला आहे.

शाळकरी मुलीचा पाठलाग करुन विनयभंग; दोघांविरुद्ध गुन्हा
सोलापूर : शाळेला जाणाऱ्या इयत्ता नववीतील मुलीचा पाठलाग करुन तिच्याशी अश्लील वर्तन करण्याचा प्रकार शहरातील एका परिसरामध्ये दुपारी दीडच्या सुमारास घडला. या प्रकरणी अश्लील वर्तन करणारा व त्याला मदत करणारा अशा दोघांंविरुद्ध फौजदार चावडी पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा नोंदला आहे.
यातील पीडित मुलीचे आई-वडील मोलमजुर करुन गुजराण करतात. १५ वर्षाची मुलगी दररोज मैत्रिणींसमवेत शाळेला जाते. या मार्गावर शेत असलेला अक्षय लोंढे काही दिवसांपासून पीडित मुलीचा पाठलाग करीत होता. दुपारी १ ते दीडच्या दरम्यान तो शाळेला जात असलेल्या पीडित मुलीच्या समोर आला आणि त्याने तिचा हात धरला. याचवेळी सागर लोंढे याने धरा तिला असे ओरडला. अचानक घडलेल्या प्रकाराने संबंधित पडित मुलगी खाली पडली. तिच्या मैत्रिणीने आरडाओरडा केल्याने दोघे पळून गेले.
घरी आल्यानंतर पिडितेने तिच्या आई-वडिलांना घडलेली घटना सांगितली. त्यानुसार पिडितेला सोबत घेऊन तिच्या आईने फौजदार चावडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार भां. द. वि. ३५४ अन्वये विनयभंगाचा गुन्हा नोंदला आहे. तपास महिला फौजदार जेऊघाले करीत आहेत.