शहरं
Join us  
Trending Stories
1
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
2
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
3
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
4
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
5
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
6
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
7
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
8
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
9
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
10
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
11
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
12
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
13
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
14
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
15
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
16
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
17
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
18
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
19
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
20
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...

सोलापुरातील मार्कंडेय उद्यानात साकारले सावरकरांचे शिल्पचरित्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2019 12:29 PM

स्मारक समितीचा उपक्रम : जयंतीदिनी शिल्पे पाहण्यासाठी सोलापूरकरांची गर्दी

ठळक मुद्देहा प्रकल्प साकारण्यासाठी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी २५ लाख रूपयांचा निधी दिला होताया शिल्पचरित्रामध्ये सावरकरांच्या जीवनातील अनेक प्रसंग आहेतमागील दोन - तीन वर्षांपासून तो परिसर सावरकर स्मारकच्या वतीने विकसित करण्यात येत आहे

यशवंत सादूल

सोलापूर : स्वातंत्र्य लढ्यात भारतमातेच्या मुक्तीसाठी आपल्या आयुष्याची तेवीस वर्षे अंदमान, रत्नागिरीसारख्या काळकोठडीत शिक्षा भोगलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकरांचे सोलापूरशी जिव्हाळ्याचे संबंध होते. त्या पार्श्वभूमीवर सोलापुरातील मार्कंडेय उद्यान येथे विश्वनाथ बेंद्रे आणि अन्य सावरकर भक्तांच्या प्रयत्नाने त्यांचा पुतळा मे १९८६ मध्ये उभारण्यात आला. 

मागील दोन - तीन वर्षांपासून तो परिसर सावरकर स्मारकच्या वतीने विकसित करण्यात येत आहे. सावरकरांच्या आयुष्यातील महत्त्वाच्या प्रसंगांची शिल्पे साकारून स्वातंत्र्य चळवळीचा जाज्वल्य इतिहास जिवंत करण्याचा प्रयत्न केला आहे.

हा प्रकल्प साकारण्यासाठी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी २५ लाख रूपयांचा निधी दिला होता. सावरकर स्मारक समितीचे माजी अध्यक्ष बाळासाहेब आपटे यांनी २५ लाख रूपये, शिक्षण मंत्री विनोद तावडे, महसूल मंत्री चंद्रकांत पाटील आणि आमदार भाई गिरकर या यांनी प्रत्येकी दहा लाख रूपये, रोहिणी तडवळ, सोलापूर महापालिका यांनी तीस लाखांचा निधी दिलेला आहे.

या शिल्पचरित्रामध्ये सावरकरांच्या जीवनातील अनेक प्रसंग आहेत. यामध्ये परदेशी कपड्यांची होळी ही घटना आहे. सावरकर पुण्यात फर्ग्युसन महाविद्यालयात शिकत असताना विदेशी कपड्यांची होळी करण्याच्या निमित्ताने लोकमान्य टिळकांची भेट घेतली. स्वातंत्र्य चळवळीत लढणाºया विविध क्षेत्रातील देशभक्तांना एकत्र करून विदेशी कपड्यांची होळी करण्यात आली़ सावरकर व टिळक यांच्यासमोर होळीचे चित्र शिल्पातून दाखविण्यात आले आहे.

सावरकरांना पन्नास वर्षे काळ्या पाण्याची शिक्षा झाल्यानंतर बोटीतून फ्रान्समार्गे अंदमानला घेऊन जाताना त्यांनी बोटीतून उडी मारून मातृभूमीला परत येण्यासाठी केलेला प्रयत्न शिल्पातून साकारण्यात आला आहे.

अंदमानमध्ये खडा बेडी, दंडा बेडी, पायात सळईने जखडून ठेवणे असे हाल ब्रिटिशांकडून होत असत. अशा परिस्थितीत असतानाही सुचलेले काव्य कागदावर उतरून ठेवत असत़ त्यालाही मनाई केली जात असे. त्यामुळे कोळशाने, सराटाच्या काड्यांनी भिंतीवर काव्य लिहून ते पाठ करून ठेवत असत़ हा प्रसंग भित्तीशिल्पातून साकारला आहे़ जेलमध्ये दररोज पंचवीस लिटर तेल काढण्याची शिक्षा दिली जात होती. नाहीतर २५ फटके मारले जात होते़ भारतमातेचा जयजयकार केला तरी फटक्यांची शिक्षा दिली जात असे़ हा करूण प्रसंग शिल्पातून दाखविला आहे.

ब्रायटनच्या समुद्र किनाºयावर फिरत असताना मातृभूमीची तीव्र आठवण झाल्याने सुचलेले अजरामर काव्य ‘सागरास’ व ‘जयोस्तुते’ यासारखे काव्य व प्रखर राष्ट्रवादी, विज्ञानवादी विचार शिल्पाच्या रूपात कोरून ठेवलेले आहेत़

प्रणाम भारतमातेस- स्वातंत्र्योत्तर  काळात भारताच्या प्रगतीमध्ये ज्या वेगवेगळ्या क्षेत्रातील व्यक्तींचे योगदान लाभले अशा राजकारणी, सैन्यदल, तंत्रज्ञान, अंतराळ या व्यक्तींचे भित्तीशिल्पातून दर्शन घडविले आहे. यामध्ये अटल बिहारी वाजपेयी, इंदिरा गांधी, अब्दुल कलाम, सर विश्वेश्वरय्या, डॉ़ होमी भाभा, लालबहादूर शास्त्री, कल्पना चावला, जनरल माणकेशॉ आदींचा समावेश आहे.

पतित पावन मंदिराची स्थापना- मागासवर्गीय व हिंदू समाजातील वैचारिक दरी दूर करून त्यांच्या मंदिर प्रवेशासाठी प्रयत्न सावरकरांनी केले. त्यांना मंदिरात प्रवेश देण्यासोबत रत्नागिरीमध्ये पतित पावन मंदिराची स्थापना केली.

टॅग्स :SolapurसोलापूरVinayak Damodar Savarkarविनायक दामोदर सावरकरPrakash Javadekarप्रकाश जावडेकरVinod Tawdeविनोद तावडेchandrakant patilचंद्रकांत पाटील