घरफोडी, जबरी चोरीतील संतोष कांबळेला एमपीडीए अंतर्गत स्थानबद्ध

By रूपेश हेळवे | Updated: June 22, 2023 15:27 IST2023-06-22T15:26:23+5:302023-06-22T15:27:10+5:30

विविध १६ गंभीर गुन्हे दाखल आहेत.

santosh kamble booked under mpda for burglary forcible theft | घरफोडी, जबरी चोरीतील संतोष कांबळेला एमपीडीए अंतर्गत स्थानबद्ध

घरफोडी, जबरी चोरीतील संतोष कांबळेला एमपीडीए अंतर्गत स्थानबद्ध

रूपेश हेळवे, सोलापूर : शहरातील फौजदार चावडी, जेल रोड, एमआयडीसी, विजापूर नाका आणि सदर बझार पोलीस ठाणे हद्दीतील सराईत गुन्हेगार संतोष संजय कांबळे ( वय २९, रा. आडवा नळ झोपडपट्टी, जय मल्हार चौक) याला एमपीडीए अंतर्गत स्थानबध्द करण्यात आले आहे. त्याच्यावर शस्त्राचा वापर करून जबरी घरफोडी, सायकल चोरी, खंडणी, खुनाचा प्रयत्न करणे, दरोडा घालण्याची पूर्वतयारी करणे असे विविध १६ गंभीर गुन्हे दाखल आहेत.

संतोष कांबळे याला गुन्हेगारी कारवायापासून परावृत्त करण्यासाठी यापूर्वीही २०१९ मध्ये एमपीडीए कायदा अंतर्गत कारवाई करण्यात आलेली होती. त्यानंतरही संतोष कांबळे याच्या वर्तनात कोणताच बदल झाला नाही. त्याने सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा होईल असे गुन्हेगारी कृत्य सूरूच होते. त्यामुळे त्याचे गुन्हेगारी कृत्यास वेळी प्रतिबंध करण्यासाठी पोलिस आयुक्त डॉ. राजेंद्र माने यांनी २० जून रोजी त्याचे विरुद्ध एमपीडीए अधिनियम १९८१ कलम ३ अन्वये स्थानबध्दतेचे आदेश काढले. त्यास २१ जून रोजी येरवडा कारागृह, पुणे येथे दाखल करण्यात आले आहे.

Web Title: santosh kamble booked under mpda for burglary forcible theft