सांगोला नाक्यावर दुचाकीला डंपरची धडक; एक जण ठार, एक जण जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2021 15:39 IST2021-01-31T15:39:17+5:302021-01-31T15:39:41+5:30
सोलापूर लोकमत ब्रेकिंग

सांगोला नाक्यावर दुचाकीला डंपरची धडक; एक जण ठार, एक जण जखमी
मंगळवेढा : सांगोला नाक्यावरून कामाला जाणाऱ्या दोन मित्रांच्या गाडीला डंपर ने जोराची धडक दिली. या धडकेत एकाचा जागीच मृत्यू तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना रविवारी सकाळी अकराच्या सुमारास घडली.
अंकुश भारत दोलतोडे (वय २२) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव असून माऊली हणमंत ढाणे (वय २५) हे गंभीर जखमी झाले आहेत. दोघे ही मेटकरी गल्ली, मंगळवेढा येथे राहत होते.
दरम्यान हे दोघे मित्र कामाला जाताना सांगोला नाक्यावरून जात असताना समोर येणा-या डंपरने जोराची धडक दिल्याने एकाचा जागीच मृत्यू झाला आहे. तर एकजण जखमी झाला आहे. ही घटना रविवारी सकाळी ११ सुमारास घडली आहे