शहरं
Join us  
Trending Stories
1
दिवाळी एकत्र साजरी करू, पण अजित पवारांना पुन्हा पक्षात नो एंट्री; शरद पवारांनी परतीचे दरवाजे बंद केले...
2
महागाईवर सर्वात खळबळजनक रिपोर्ट; तीन वर्षांत कुटुंबांची घरगुती बचत ९ लाख कोटींनी घटली
3
साताऱ्याच्या बदल्यात राज्यसभा मिळाली! पार्थ पवारांना दिल्लीत पाठविण्यावर अजित पवारांचे मोठे संकेत
4
सुप्रियाने पवार-सुळे असे नाव लावले असते तर..? शरद पवारांनी सांगितला तिने घेतलेला एक निर्णय...
5
अदानी-अंबानींकडून टेम्पाेने पैसा आला का? मोदींच्या सवालावर राहुल गांधींचे चोख प्रत्तूत्तर...
6
नावात काय आहे? विचारत हायकोर्टाने फेटाळल्या नामांतराविरोधातील याचिका
7
कर्मचारी सुट्टीवर; विमाने जमिनीवर; ‘एअर इंडिया एक्स्प्रेस’ची ९० उड्डाणे रद्द
8
मी ठाण मांडून बसलो, म्हणजे करेक्ट कार्यक्रम होणार: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
9
शाळेत अ‍ॅडमिशन मिळणार का? न्यायालयात स्थगितीनंतर आरटीई ऑनलाइन अर्जाला ब्रेक, पालक अस्वस्थ 
10
हेड, अभिषेकने घातला धुमाकूळ; लखनौचा पाडला फडशा; हैदराबादचा १० गड्यांनी दणदणीत विजय
11
तीन वर्षांनंतर भारतात खेळणार नीरज; राष्ट्रीय फेडरेशन चषक स्पर्धेची उत्सुकता शिगेला
12
भारतीय अर्थव्यवस्था 8% दराने वाढणार; देशाच्या मुख्य आर्थिक सल्लागारांनी व्यक्त केला विश्वास
13
'इंडिया' आघाडी भ्रष्टाचारी; भाजपकडे नेता, नीती अन् विकासाचा कार्यक्रम तयार: अमित शाह
14
ट्रॅव्हिड हेडने कुटल्या १२ चेंडूंत ५८ धावा! अभिषेक शर्मासह ३६ चेंडूंत फलकावर चढवल्या १०७ धावा
15
महा-बीसीए, बीबीए, एमसीए, एमबीए CET प्रवेश परीक्षा २९ मे रोजी; सुधारित वेळापत्रक जाहीर
16
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
17
Air India ने 80 उड्डाणे रद्द केल्याबद्दल मागितली प्रवाशांची माफी; तिकीटाचे पैसेही परत करणार...
18
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
19
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
20
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज

वाळू माफियांचा मंडलाधिकाऱ्यासह तलाठ्यावर हल्ला; सांगोला तालुक्यातील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 06, 2020 8:44 PM

अवैध वाळू वाहतूक करणारी वाहने जप्त; सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल

ठळक मुद्देशनिवारी पहाटेच्या सुमारास घडली घटनासात जणांविरुद्ध सांगोल्यात गुन्हा दाखलअवैध वाळू वाहतूक करणारी वाहने जप्त

सांगोला :  अवैद्य वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई करीत असताना दोन वाहनांतून आलेल्या ७ वाळू माफियांनी अचानक हल्ला करून हाताने लाथाबुक्यानी व काठीने जबर मारहाण केली. यात मंडलाधिकारीसह तलाठी असे दोघेजण जखमी झाले. ही घटना शनिवार ६ जून रोजी पहाटेच्या सुमारास कोळा (इराचीवाडी) ता. सांगोला येथे घडली. 

याबाबत, कोळा मंडलाधिकारी नितीन जाधव यांनी फिर्याद दाखल केली असून पोलिसांनी शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी कृष्णा हरी गडदे (रा. गौडवाडी ता. सांगोला), अक्षय पूर्ण नाव माहीत नाही, अल्ताफ मुबारक आतार (रा. कोळा ता. सांगोला), शिवाजी कोळेकर व उमेश कोळेकर (रा. आरेवाडी ता. कवठेमंकाळ जि. सांगली) यांच्यासह अन्य दोघे अशा ७ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

तहसीलदार योगेश खरमाटे यांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे कोळा मंडलाधिकारी नितीन जाधव व तलाठी काटकर असे दोघेजण मिळून कोळा हद्दीतील महादेव आलदर याच्या घराजवळ अवैध वाळू वाहतूक करणारे वाहनांवर कारवाई करण्याचे शासकीय काम करीत असताना बिगर नंबरच्या पांढऱ्या रंगाच्या बोलेरो व इनोव्हा कारमधून आलेल्या ७ जणांनी मंडलाधिकारी नितीन जाधव यांच्यावर अचानक हल्ला करून शिवाजी कोळेकर याने त्यांना काठीने व त्याच्या सोबत इतर लोकांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केले.  यावेळी त्यांना वाचविण्यासाठी पुढे आलेले तलाठी काटकर यांनाही शिवाजी कोळेकर याने डोक्यात काठीने मारहाण करून जखमी केले.  सदर घटनेनंतर सर्वजण दोन्ही वाहनांतून पसार झाले. तपास पोलीस उपनिरिक्षक प्रशांत वसगडे करीत आहेत. 

टॅग्स :Solapurसोलापूरsangole-acसांगोलाCrime Newsगुन्हेगारीSolapur rural policeसोलापूर ग्रामीण पोलीस