सोलापुरात संभाजी ब्रिगेड आक्रमक; गोपीचंद पडळकरांच्या वक्तव्याचा मंगळसूत्र दाखवून केले निषेध आंदोलन
By आप्पासाहेब पाटील | Updated: April 18, 2025 15:59 IST2025-04-18T15:58:26+5:302025-04-18T15:59:03+5:30
संभाजी ब्रिगेडच्या वतीने चार हुतात्मा चौकातील राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून व भंडारा उधळून संभाजी ब्रिगेडच्या विरोधात बेताल वक्तव्य करणाऱ्या गोपीचंद पडळकर याच्या वक्तव्याचा निषेधार्थ आंदोलन करण्यात आले.

सोलापुरात संभाजी ब्रिगेड आक्रमक; गोपीचंद पडळकरांच्या वक्तव्याचा मंगळसूत्र दाखवून केले निषेध आंदोलन
सोलापूर : संभाजी ब्रिगेडच्या वतीने चार हुतात्मा चौकातील राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून व भंडारा उधळून संभाजी ब्रिगेडच्या विरोधात बेताल वक्तव्य करणाऱ्या गोपीचंद पडळकर याच्या वक्तव्याचा निषेधार्थ आंदोलन करण्यात आले.
दरम्यान, आ. गोपीचंद पडळकर हे काही दिवसांपासून संभाजी ब्रिगेडबद्दल वेगवेगळी बेताल वक्तव्य करीत आहे. पडळकर हे धनगर बांधवांना आरक्षण मिळवून देतो असे जाहीर आश्वासन देऊन सुद्धा धनगर आरक्षणावर काहीच बोलत नाहीत, बिरोबाची खोटी शपथ घेऊन भाजपाला मत देऊ नका म्हणणारे आज भाजपचेच काम करत आहे. राजमाता अहिल्यादेवी होळकरांच्या विचारावर व धनगर बांधवांच्या उन्नतीसाठी काहीच करत नसून फक्त धनगर बांधवांचे डोके भडकवण्याचे काम पडळकर करीत आहेत असा आरोप संभाजी ब्रिगेडच्या वतीने करण्यात आला.
यावेळी संभाजी ब्रिगेडचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष शाम कदम, जिल्हाध्यक्ष संभाजीराजे भोसले, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष मीनल दास, शहराध्यक्ष शिरीष जगदाळे, वकील आघाडीचे जिल्हाध्यक्ष गणेश कदम, शहर सचिव सिद्धाराम सावळे, शहर संघटक शेखर कंटीकर, शहर संघटक सतीश वावरे, दिलीप निंबाळकर, अभिषेक जाहीरदार, शहर उपाध्यक्ष संतोष सुरवसे, शहर उपाध्यक्ष फिरोज सय्यद, वैभव धुमाळ, शहर कार्याध्यक्ष जयश्री जाधव, दक्षिण सोलापूर तालुका अध्यक्ष सुनिता घंटे, शहर उपाध्यक्ष मनीषा कोळी आदी उपस्थित होते.