चौदा वर्षाच्या सावत्र मुलीला धंद्यावर बसवतो म्हणत पित्याचं असभ्य वर्तन
By विलास जळकोटकर | Updated: November 28, 2023 17:15 IST2023-11-28T17:14:57+5:302023-11-28T17:15:25+5:30
यातील फिर्यादीत म्हटले आहे की, पिडितेची आई ही शहरातील एका वस्तीमध्ये राहते. भाजीपाला विक्री व्यवसायातून ती आपल्या कुटुंबाची उपजीविका करते.

चौदा वर्षाच्या सावत्र मुलीला धंद्यावर बसवतो म्हणत पित्याचं असभ्य वर्तन
सोलापूर : चौदा वर्षाच्या सावत्र मुलीला धंद्यावर बसवतो असे म्हणत तिच्याशी अश्लील चाळे करणाऱ्या सावत्र पित्याच्या विरोधात पत्नीने तक्रार दिल्याने त्याच्याविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा सोमवारी जोडभावी पोलीस ठाण्यात विनयभंग व लैंगिक छळाचा गुन्हा नोंदला आहे.
यातील फिर्यादीत म्हटले आहे की, पिडितेची आई ही शहरातील एका वस्तीमध्ये राहते. भाजीपाला विक्री व्यवसायातून ती आपल्या कुटुंबाची उपजीविका करते. तिला दोन मुली आणि एक मुलगा आहे. पिडितेच्या आईचे पूर्वी एका तरुणाशी लग्न झाले होते त्यापासून दोन मुली झाल्या. काही वर्षांनी दोघांचे न पटल्याने पिडितेच्या आईने दुसऱ्याशी लग्न केले. दहा-बारा वर्षानंतर त्याच्याशीही भांडण झाल्यामुळे अडीच वर्षांपूर्वी तिसऱ्याशी लग्न करुन ते एका वस्तीत राहत होते.
गेल्या महिन्यातील ९ ऑक्टोबरच्या दिवशी तिसरा पती दारु पिऊन घरी आला आणि त्याने १४ वर्षाच्या पिडित मुलीचा हात पकडून ‘तिच्याशी अश्लिल हावभाव केले, हात पकडून तिला धंद्यावर बसवतो अशी भाषा वापरली. याबद्दल कोणाला सांगितले तर ठार मारण्याची धमकी दिली. यामुळे याबद्दल तक्रार दिली नाही. मात्र त्यानंतरही दोन्ही मुलीशी ते अश्लिल वर्तन करीत असल्याने पोलिस ठाण्यात तक्रार देत असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
या प्रकरणी जोडभावी पोलीस ठाण्यात भा. दं. वि. ३५४, बाल लैंगिक छळाचा गुन्हा नोंदला आहे. अधिक तपास महिला फौजदार व्हट्टे करीत आहेत.