शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

रुबेला, पोलिओ, धनुर्वात, रोटाव्हायरस डायरिया, गोवर लसींमुळे मुलांना होणारे आजार आटोक्यात

By appasaheb.patil | Published: March 16, 2019 1:17 PM

जागतिक लसीकरण दिवस

ठळक मुद्देलसीकरणाअभावी लहान मुलांना वर्षभरात विविध आजारांचा सामना करावा लागतो. शासकीय लसीकरण मोहिमेनुसार विविध मनपा आरोग्य केंद्रावर तसेच घरोघर जाऊन राबविल्या जाणाºया मोहिमेत लसी दिल्या जातातरुबेला, पोलिओ, धनुर्वात, रोटाव्हायरस, गोवर लसींमुळे लहान मुलांना होणारे ९० टक्के आजार आटोक्यात

आप्पासाहेब पाटील

सोलापूर : लसीकरणाअभावी लहान मुलांना वर्षभरात विविध आजारांचा सामना करावा लागतो. शासकीय लसीकरण मोहिमेनुसार विविध मनपा आरोग्य केंद्रावर तसेच घरोघर जाऊन राबविल्या जाणाºया मोहिमेत लसी दिल्या जातात. सध्या शासकीय यंत्रणा व खासगी रुग्णालयात देण्यात येणाºया रुबेला, पोलिओ, धनुर्वात, रोटाव्हायरस, गोवर लसींमुळे लहान मुलांना होणारे ९० टक्के आजार आटोक्यात आले आहेत, मात्र १० टक्के पालक लसीकरण अर्धवट सोडत असल्यामुळे त्याचा मुलांवर दूरगामी परिणाम होत असल्याची खंत बालरोगतज्ज्ञ डॉ़ अतुल कुलकर्णी यांनी व्यक्त केली. 

लसीकरण हा बाळाच्या संगोपनातला महत्त्वाचा घटक आहे. बालमृत्यू कमी करण्याचा हा एक खात्रीचा व अत्यंत सोपा असा मार्ग आहे. १ वर्षाच्या आत बालकाचे प्राथमिक लसीकरण पूर्ण होणे आवश्यक आहे. गोवरच्या लसीबरोबर अ जीवनसत्वाचा पहिला डोस देणे गरजेचे आहे. सहज उपलब्ध असलेल्या रोगप्रतिकारक लसींचा वापर न केल्यामुळे दरवर्षी १.७ दशलक्ष मुले विविध रोगांना बळी पडतात. लसीकरण केलेल्या मुलामुलींचा अशा प्राणघातक रोगांपासून किंवा त्यांच्यामुळे उद्भवणाºया विकृतींपासून बचाव होतो. लसीकरण मिळणे हा प्रत्येक बाळाचा हक्क आहे. प्रत्येक मुलामुलीचे लसीकरण करणे गरजेचे आहे. गर्भवतीचे व तिला होणाºया बाळाचे धनुर्वात उर्फ टिटॅनसपासून रक्षण होण्यासाठी लसीकरण आवश्यक असते. सध्या बाजारात ४०० रुपयांपासून ते ३ हजार रुपयांपर्यंतच्या लसी खासगी रुग्णालयात मिळू लागले आहेत़ 

आजार व वयानुसार दिली जाणारी लस

  • - बाळ जन्मल्यानंतर २४ तासांत बीसीजी, झीरो पोलिओ आणि झीरो हिपॅटायटिस
  • - दीड महिन्याचे झाल्यावर धनुर्वात, घटसर्प, डांग्या खोकला यांची त्रिगुणी लस याशिवाय मेंदुज्वर 
  • - वय वर्षे दीड ते साडेतीन वर्षांतील बालकांसाठी इंजेक्शन पोलिओ
  • - नवव्या महिन्यानंतर गोवरची लस, एमएमआर, मम्स, रुबेला. याच दरम्यान टायफाईडची लस दिली जाते़
  • - साडेचार ते पाच वर्षात डीपीटीचा दुसरा बुस्टर डोस
  • - नवव्या महिन्यापासून दर सहा महिन्यांनी जीवनसत्वाची मात्रा ६ व्या वर्षापर्यंत
  • - रोटाव्हायरस डायरियाची लस दिल्यास अतिसार, जुलाब, उलट्यांना आळा बसतो. टायफाईड न्यूमोनियासारख्या आजारांपासून बचाव करता येतो.
  • - सर्व्हाईकल कॅन्सरचे लसीकरण नसल्यास गर्भपिशवीचा कर्करोग होण्याची शक्यता बळावते.

या आहेत नव्या लसी- मेंदुज्वर लस, रोटाव्हायरस डायरियाची लस, कावीळ अ लस, न्यूमोनिया लस, टायफाइड लस, एमएमआर (गोवर, गालफुगी आणि रुबेलाचा समावेश असलेली लस), चिकनपॉक्स (कांजण्याची लस), व्हायरल फ्लू लस, सर्व्हाईकल कॅन्सर लस़ 

गर्भाशयाचा कॅन्सर रोखण्यासाठी नवी लस

  • - अलीकडच्या काळात महिलांमध्ये गर्भाशयाच्या कॅन्सरचे प्रमाण वाढत आहे़ याशिवाय दरमहा १२५ ते १५० महिला कर्करोगाने ग्रस्त असल्याचे निदान होत आहे. याशिवाय खासगी रुग्णालयांचा आकडा वेगळा आहे. या वाढत्या प्रमाणाला आळा घालण्यासाठी वयोगट ९ ते ११ वर्षातील मुलीसाठी ‘एचपीव्ही’(हिंदुस्थान, पुना, विशाखापट्टणम) ही लस बाजारात आली आहे़ या लसीमुळे महिलांना होणाºया गर्भाशयाच्या कॅन्सरवर मात करण्यात डॉक्टरांना यश येत आहे़ 

सर्व पालकांना, बाळाचे लसीकरण कशासाठी, केव्हा, कोठे व कसे करावे याची माहिती असायला हवी. मूल आजारी असले, त्याला काही व्यंग असले किंवा ते कुपोषित असले तरी देखील त्याचे लसीकरण करणे सुरक्षित आहे ही बाब पालकांना माहीत असणे गरजेचे आहे. वाढत्या आजारांच्या बचावासाठी मुलांसाठी लसीकरण करणे काळाची गरज आहे़- डॉ़ अतुल कुलकर्णीबालरोगतज्ज्ञ, सोलापूर 

टॅग्स :SolapurसोलापूरHealthआरोग्यMedicalवैद्यकीयchildren's dayबालदिन