शहरं
Join us  
Trending Stories
1
त्याच पाकिस्तानने सणसणीत वाजवली! इराणच्या अण्वस्त्र कार्यक्रमाला दिला पाठिंबा, अमेरिका...
2
शिवसेनेचा बाप मीच आहे, भाजपा आमदार परिणय फुकेंचं वादग्रस्त विधान; शिंदेसेना संतप्त
3
NSDL IPO Allotment Status: NSDL आयपीओला तुफान प्रतिसाद; लेटेस्ट GMP सह जाणून घ्या कसं चेक कराल अलॉटमेंट स्टेटस?
4
झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचे निधन; किडनीच्या आजाराने होते त्रस्त
5
संशयाचं भूत मानगुटीवर बसलं, सीआरपीएफच्या जवानानं पत्नीचं मुंडकं छाटलं! वृत्त वाहिनीच्या ऑफिसमध्ये गेला अन्...
6
हातखंबा येथे पुन्हा अपघात, गॅसवाहू टँकर वडापावच्या टपरीवर आदळला; ग्रामस्थांनी महामार्ग अडवला
7
भारताबाबत ट्रम्प यांनी मोठी चूक केली, दिग्गज अर्थतज्ज्ञानं साधला निशाणा; म्हणाले, "हे म्हणणं एकदम..."
8
"युक्रेनविरुद्धच्या युद्धासाठी भारत रशियाला निधी पुरवतोय"; डोनाल्ड ट्रम्पच्या जवळच्या सहकाऱ्याचा मोठा आरोप!
9
Share Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात; Sensex १६६ आणि निफ्टी ३१ अंकांच्या तेजीसह खुला, 'हे' शेअर्स वधारले
10
समृद्धीने सुसाट निघाल तर पकडले जाल, तुमच्यावर लक्ष ठेवणार एक हजार ‘डोळे’
11
दोन व्होटर आयडींच्या आपल्याच दाव्यामुळे तेजस्वी अडचणीत, निवडणूक आयोगाची नोटीस; तपशील मागितला
12
‘महादेवी’ हत्तीण प्रकरणात शासनाचा आदेश नाही, उद्या मुंबईत बैठक : मुख्यमंत्री
13
Video : ६०० वर्षांनंतर पहिल्यांदाच! भूकंपानंतर ज्वालामुखीचा उद्रेक; रशियाच्या कामचटकाचा धोका अजूनही टळेना
14
आंध्र प्रदेशातील ग्रॅनाइट खाणीत मोठी दुर्घटना, ६ स्थलांतरित कामगारांचा मृत्यू, ३ जखमी
15
पुत्रदा एकादशी-बुध प्रदोष: ८ राशींना सर्वोत्तम काळ, शुभ-लाभ; हाती पैसा राहील, कल्याण होईल!
16
सुरक्षित गुंतवणुकीसह जबरदस्त रिटर्न! कमाईची उत्तम संधी आहेत या ५ स्कीम; मिळेल ८% पेक्षा जास्त व्याज
17
वसईची भयंकर घटना, मुंबईला धोक्याची घंटा!
18
मनसे, उद्धवसेना, शेकाप, राष्ट्रवादी एकत्र आले म्हणजे..?
19
विमान उड्डाण करणारच होतं अन् केबिन तापलं; एअर इंडियाची 'ही' फ्लाइट झाली रद्द 
20
‘झोपु’ योजनेत ८० कोटींचा घोटाळा; विकासकांवर गुन्हा; आशापुरा ग्रुपच्या ७ जणांविरोधात टिळक नगर पोलिसांकडून तपास सुरू

आई, मामाच्या लग्नाचा वाढदिवसाचा केक आणण्यासाठी गेलेल्या रोहनचा अपघाती मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2021 08:51 IST

अक्कलकोट-चपळगाव मार्गावरील पुलानजदीकचा रस्ता ठरतोय मौत का कुऑ

चपळगाव : एकाच मांडवात आई व मामाचा झालेल्या लग्नाचा वाढदिवस रविवारी. लग्नाच्या वाढदिवशी आई व मामाला शुभेच्छा देण्यासाठी केकची व्यवस्था कशी करावी? हा प्रश्न रोहनला भेडसावत होता. कारण रविवारपासून कडक लाॅकडाऊनची घोषणा. मग काही करून शनिवारीच केकची व्यवस्था करायची या बेताने अक्कलकोटला गेलेल्या रोहनचा अक्कलकोट-चपळगाव मार्गावरील पुलाजीकच्या रस्त्यावर ट्रकखाली चिरडून अपघाती मृत्यु झाला. केक आणण्यासाठी गेलेल्या रोहनवर काळाने झडप घातली अन् सर्वांचाच काळजाचा ठोका चुकला.

मयत झालेला रोहन राम व्हनकडे (वय २२ वर्षे) हा दोनच महिन्याखाली महावितरणमध्ये कंत्राटी पध्दतीने कामाला लागला होता. आई अंगणवाडीची मदतनीस अन् वडिल मजुरीचे काम करतात. या दोघांनी मोठ्या कष्टातुन संसार उभा केला. या जाणीवेतून रोहन मोठ्या जिद्दीने महावितरणमध्ये काम करत होता. मुळचे वळसंगचे असलेले व्हनकडे कुटूंब चपळगावला स्थायिक झालेले. गावातच मामा अनिल कांबळे असल्याने सतत मामाच्या सानिध्यात वावरलेल्या रोहनने आई-मामाच्या लग्नाच्या वाढदिवसाचा केक शनिवारीच मिळवायचा हा निश्चय रोहनने केला.

शनिवारी नेहमीप्रमाणे कामाला गेलेल्या रोहन व्हनकडे यांने कर्जाळ गावातील काम संपवून अक्कलकोटला मित्र कल्याणी मुनाळे (रा.काझीकणबस) याच्यासोबत  केकसाठी गेला. मोठी खटाटोप करून केक मिळविल्यानंतर आनंदाने रोहन आपल्या मित्रासोबत चपळगावच्या दिशेने जात असताना अक्कलकोटनजीक पुलाजवळ ट्रकच्या धडकेने रोहनचा जागेवरच अपघाती मृत्यु झाला.अपघात इतका भयानक होता की यामध्ये रोहनच्या पायाला,डोक्याला व कंबरेला गंभीर दुखापत झाली होती.आणि म्हणूनच उपचारापूर्वी डाॅक्टरांनी रोहनला मृत झाल्याचे घोषित केले.अजिंक्य कांबळे यांनी फिर्याद दिली असून अक्कलकोट उत्तर पोलिस ठाण्याकडून अधिक तपास सुरू आहे.

छोट्या कामातुन वाचतील लाखमोलांचे जीव,

अन्यथा लाॅकडाऊननंतर आंदोलनाचा इशारा..!_

सध्या अक्कलकोट-सोलापूर मार्गाचे काम सुरू आहे.जड वाहनांसाठी सोलापूर मार्गावरून बायपास पध्दतीने चपळगाव मार्गाला लागूनच हा रस्ता विभागून गेला आहे.त्यातच चपळगाव मार्गावरून मोठ्या उड्डाणपूलाचे बांधकाम सुरू आहे. याच कारणामुळे अक्कलकोट-चपळगाव व सोलापूर-गुलबर्गा या एकमेकांना छेदलेल्या रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना वाहने दिसत नाहीत. यामुळे गेल्या अनेक महिन्यांमध्ये अनेक अपघात घडले आहेत. कित्येकांचे जीव गेले आहेत. म्हणून याठिकाणी छेदलेल्या दोन्ही मार्गावर पुलाजवळ गतिरोधक बनविल्यास अपघात टाळता येतात. म्हणूनच संबधितांनी ताबडतोब गतिरोधक बनविण्याची मागणी चपळगाव पंचक्रोशीतील जनतेतुन होत आहे.अन्यथा लाॅकडाऊननंतर मोठे आंदोलन करण्याचा इशारा सरपंच उमेश पाटील यांनी दिला आहे. 

टॅग्स :SolapurसोलापूरAccidentअपघातakkalkot-acअक्कलकोट