शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

वडशिंगे येथे पहाटे पडला दरोडा; पती, पत्नी जखमी, लाखोंचा ऐवज लुटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2021 18:28 IST

सोलापूर लोकमत ब्रेकिंग

माढा : माढा तालुक्यातील वडशिंगे येथे ऐन दिवाळीच्या पाडवा पुजनाच्या रात्री दरोडेखोरांनी दरोडा टाकून लाखोंचा ऐवज लुटला आहे. यामध्ये दरोडेखोरांनी केलेल्या मारहाणीत स्टॅम्प रायटर सुरेश कदम यांच्यासह त्यांची पत्नी वैशाली आणि मुलगा रितेश हे जखमी झाले आहेत. 

एकीकडे लोक दिवाळीचा आनंद घेत असताना अनेक ठिकाणी अपघात आणि चोऱ्या होण्याच्या घटना घडल्या आहेत. वडशिंगे येथील कदम कुटुंबाला मारहाण करून दरोडेखोरांनी हा दरोडा टाकला आहे. चोरी, दरोडा अशा प्रकारचे गुन्हे रोखण्यासाठी ग्रामसुरक्षा यंत्रणा सक्षम करण्यात आलेली असतानाही वडशिंगे येथे हा दरोडा पडला आहे. वडशिंगे गावात मध्यभागी असलेल्या सुरेश कदम यांच्या घरावर मध्यरात्री हा दरोडा पडला. घरात प्रवेश केल्यानंतर दरोडेखोरांनी लाकडी दांडके आणि पाईप यांनी मारहाण करीत घरातील सदस्यांकडे सोने आणि पैशाची मागणी केली. यावेळी दरोडेखोरांनी रोख रक्कम ९० हजार आणि ८० हजार रुपये किमतीचे सोन्याचे गंठण, सोन्याच्या अंगठ्या, कर्णफुले, झुबे, पैंजण, जोडवे असा २ लाख ८ हजार ५०० रुपयांचा ऐवज लुटून नेला आहे. 

हा दरोडा घालून दरोडेखोरांचे समाधान झाले नाही. त्यांनी निमगाव रस्त्यावर असलेल्या आणखी एका घरात दरोडा टाकण्याचा प्रयत्न केला पण हा प्रयत्न फसला. हा प्रयत्न होण्याआधीच ग्राम सुरक्षा दल सावध झाले होते. फोन खणखणल्याने लोक जागे झाले होते त्यामुळे दरोडेखोरांना येथून पळ काढण्याशिवाय पर्याय उरला नव्हता. पुन्हा एकदा ग्राम सुरक्षा यंत्रणेमुळे आणखी एक दरोडा टळला आहे. 

       

टॅग्स :SolapurसोलापूरCrime Newsगुन्हेगारीThiefचोरmadha-acमाढा