शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
2
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
3
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
4
मित्रपक्षांमुळे भाजपला ‘४०० पार’ची चिंता; सर्वाधिक काळजी महाराष्ट्रात
5
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
6
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
7
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
8
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
9
निवडणुकीसाठी विक्रमी खर्च; ग्रामीण अर्थव्यवस्थेला बूस्ट; १.३५ लाख कोटींची उलाढाल
10
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
11
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
12
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
13
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
14
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
15
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
16
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
17
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
18
मुलाच्या ‘बर्थ डे’साठी घरी निघाला होता शहीद जवान; मृत्यूचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू
19
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा
20
तंत्रज्ञानाचा वापर खेळासाठी चांगला; भारताच्या पहिल्या महिला कसोटी पंचाचे मत

लाहोरच्या हिरा मंडीची समृद्धी ...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 07, 2020 4:24 PM

मुजरा नृत्य करणाºया स्त्रियांबद्दल अनेक लोकोपवाद होते आणि आजही आहेत.

एकविसाव्या शतकात आपल्या देशभरात मुजरानृत्य क्षेत्रातल्या मुली डान्सबार कल्चरमध्ये गेल्या. डान्सबार बंद झाल्यानंतर त्यांचे शोषणच झाले. मुंबईच्या ग्रांट रोडवरील केनेडी ब्रिजजवळील जुन्या काँग्रेस हाऊसमध्ये अनेकांनी आपला बाजार मांडला. आजघडीला आपल्या देशात फक्त आग्रा शहरातच मुजरा शिकविला जातो. मात्र इ़स़ २००० पर्यंत आताच्या बंगालमध्ये बनारसी तवायफ आपलं अस्तित्व टिकवून होत्या. आता चोबीस परगणा, बार्दवान, बांकुरा, वीरभूम या जिल्ह्यात पेरिफेरल भागात काही कोठे अजूनही अस्तित्वात आहेत. इतरत्र सांगायचे झाल्यास बनारसच्या शिवदासपूरमध्ये त्यांचे अस्तित्व आहे. अन्यत्र त्यांची संख्या नगण्य आहे. अलीकडे हिंदी सिनेमातही मुजरानृत्ये घटत आहेत. कदाचित लोकांना त्यात पूर्वीसारखी रुची राहिली नसावी. डिजिटल युगात करमणुकीच्या व्याख्या वेगाने बदलत चालल्याचा हा परिणाम असू शकतो.  ज्या मुजरा नार्तिकांकडे अन्य काही कौशल्य नव्हते त्यांच्यावर मात्र या मरगळीपायी कुºहाड कोसळली. पैकी उपजीविकेचे साधन नसल्याने त्यातल्या अनेकींनी देहविक्रयाचा मार्ग नाईलाजाने निवडला. 

मुजरा नर्तिका, गायिका यांचा जगातला सर्वात मोठा बाजार लाहौरमधील हिरा-मंडीमध्ये भरतो. आपल्या नारायणगावला जशी तमाशापंढरी म्हणतात तसंच हिरा मंडीलाही संबोधलं जातं. आपल्या अनेक साहित्य व कलाकृतींचा विषय ठरलेल्या मुजरा नर्तिका असलेल्या अनारकलीचे मूळ लाहौरमध्येच सापडते. ‘अकबरनामा’ आणि ‘तुझुक -ए- जहांगिरी’ अर्थात ‘जहांगीरनामा’ या दोहोतही अनारकलीचा उल्लेख नाही, पण ईस्ट इंडिया कंपनीच्या नीळाच्या व्यापारासाठी भारतात आलेला विल्यम फिंच १६११ मध्ये लाहौर येथे पोहोचला तेव्हा त्याला अनारकलीविषयी माहिती मिळाली, असे त्याने नमूद केले आहे. अनारकलीच्या निधनानंतरच्या सहा वर्षे पश्चातचा हा कालावधी असल्याचे तो म्हणतो. विल्यम फिंचच्या काही वर्षांनंतर भारतात आलेल्या एडवर्ड टेरी या ब्रिटिश प्रवाशानेही अनारकलीचे उल्लेख केले आहेत. इतिहासात तिच्या अस्तित्वाबद्दल एकमत नाही, मात्र तत्कालीन मुजरा संस्कृती आणि गुलाम महिलांचे शोषण यावर सहमती आहे. लाहौरच्या मुजरा इतिहासाची सुरुवात अशाप्रकारे चारशेहून अधिक वर्षांची आहे.

मुजरा नृत्य करणाºया स्त्रियांबद्दल अनेक लोकोपवाद होते आणि आजही आहेत. खरेतर यातल्या बहुतांश स्त्रिया खूप प्रेमळ, लाघवी असतात, त्या सच्च्या प्रेमाच्या भुकेल्या असतात. यातल्या काहींचा रोख त्यांच्या ग्राहकांच्या पैशावर, संपत्तीवर जरुर असतो हेदेखील येथे नमूद करावेच लागेल. अन्यथा लेख संतुलित होणार नाही. जिथं सामान्य माणसांच्या मनात खोट असू शकते तिथे यांच्या मनात का असू नये ? आपल्यातल्या कुणालाच ‘आनंदबाबू’ बनायचे नाही, पण तरीही जर कधी कुठल्या मुजरावालीशी वा कोठेवालीशी सामना झाला तर तिच्यात वेश्या पाहायची की पुष्पाला शोधायचं हे आपल्या संस्कारांवर अवलंबून आहे. त्याचबरोबर बदलत्या काळात श्रीमंती, अय्याशी आणि ऐशआरामाच्या नव्या संदर्भानुसार या दशकात काही ठिकाणी विवाह सोहळ्यात नाचण्याच्या निमित्ताने पुन्हा एकदा मुजरा कलावंतांचं पुनरुज्जीवन होऊ लागलंय. मात्र त्यांच्या या स्वरूपास समाज कोणत्या नजरेने पाहतो हे काळच ‘मुकद्दर का सिकंदर’मध्ये जोहराबाई सिकंदरला म्हणते की, ‘एक तवायफ की जिंदगी कोठे से शुरू होती हैं और कोठे पे खतम होती है..’ आता कोठे उरले नाहीत आणि मुजरा नर्तिकाही इतिहासजमा झाल्यात.  त्याचबरोबर अलीकडील काळात मुजरा नृत्याच्या नावाखाली बीभत्स आणि हिडीस नृत्य करणाºया तोकड्या कपड्यातील नार्तिकांचा (?) धांगडधिंगा घालणाºयांबद्दल लिहावं वाटत नाही. मुजरा नृत्य आणि नर्तिकांच्याबद्दल मानवी मनात प्रेम, वासना, रसिकता, सौंदर्य आसक्ती, आकर्षण अशा विविध भावना असू शकतात. त्याचे उदात्तीकरण करणे वा त्याचा धिक्कार करणे हा स्वतंत्र लेखाचा विषय असू शकतो. या भावनांचे स्वरूप काहीही असले तरी मुजºयाच्या या पाऊलखुणा अत्यंत वेधक आणि देखण्या होत्या, हे नक्की. आयुष्यात जेव्हा कधी पाकिस्तानला जायचा योग येईल तेव्हा लाहौरच्या ‘हिरा मंडी’ला नक्की भेट देऊन माझ्या पोतडीत काही नवीन चीजा सामील करून घेईन. तिथल्या स्त्रिया संपन्नावस्थेत नसल्या तरी त्यांच्यामुळे अनेकांची आयुष्ये समृद्ध झाली असतील, हे नक्की.- समीर गायकवाड(लेखक परिवर्तनवादी चळवळीचे खंदे समर्थक आहेत.) 

टॅग्स :Solapurसोलापूरdanceनृत्य