बार्शीत दोन दुचाकींच्या अपघातात सेवानिवृत्त एसटी कर्मचाऱ्याचा मृत्यू
By काशिनाथ वाघमारे | Updated: January 4, 2024 19:30 IST2024-01-04T19:30:32+5:302024-01-04T19:30:53+5:30
परत गावाकडून पानगाव मार्गे हे बार्शीकडे दुचाकीवरून येत असताना बार्शीकडून समोरून येणाऱ्या दुचाकीने जबर धडक दिली.

बार्शीत दोन दुचाकींच्या अपघातात सेवानिवृत्त एसटी कर्मचाऱ्याचा मृत्यू
सोलापूर : माढ्याहून बार्शीकडे दुचाकीवरून येणाऱ्या सेवानिवृत्त एसटी कर्मचाऱ्यास दुसऱ्या एका दुचाकीने जबर धडक दिल्याने त्यांचा मृत्यू झाला. हा अपघात बार्शी-सौंदरे गावाजवळील रोडवर ३ जानेवारी रोजी रात्री सात वाजण्याच्या सुमारास घडला.
दत्तात्रय आंबऋषी देशमुख (वय ७१, रा. धानोरे, ता. माढा, सध्या रा. अलिपूर रोड, बार्शी) असे त्या मरण पावलेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, दत्तात्रय देशमुख हे बार्शीतील अलीपूर रोडवरील कर्मवीर हाउसिंग सोसायटीत राहत असून या दिवशी ते धानोरे (ता.माढा) येथे स्वतःच्या गावी शेतात गेले होते.
परत गावाकडून पानगाव मार्गे हे बार्शीकडे दुचाकीवरून येत असताना बार्शीकडून समोरून येणाऱ्या दुचाकीने जबर धडक दिली. त्यात ते गंभीर जखमी झाले. पोलिसांनी तत्काळ खासगी हॉस्पिटलमध्ये उपचारास दाखल केले. मात्र, उपचार सुरू असताना रात्री ११ वाजण्याच्या सुमारास मरण पावले. ग्रामीण रुग्णालयात त्याचे शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाइकाच्या ताब्यात दिला. पुढील तपास पोलिस संदीप पाटील करत आहेत.