लॉकडाउनचा परिणाम: सुखाचे क्षण टिपणारे फोटोग्राफर दु:खात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2020 12:02 PM2020-04-21T12:02:08+5:302020-04-21T12:03:53+5:30

विवाह समारंभ लांबले अन् कार्यक्रमही थांबले; फोटोग्राफर व्यावसायिकांची उपासमार सुरू

Result of lockdown: Photographers grieving the moments of happiness | लॉकडाउनचा परिणाम: सुखाचे क्षण टिपणारे फोटोग्राफर दु:खात

लॉकडाउनचा परिणाम: सुखाचे क्षण टिपणारे फोटोग्राफर दु:खात

Next
ठळक मुद्देफोटोग्राफर बांधवांचे आर्थिक चक्र विस्कळीत झालेसांगा, आता करायचं काय? हाच प्रश्न समोर आला आहेलॉकडाउनमुळे आर्थिक अडचणीत वाढ झाली आहे

नासीर कबीर 

करमाळा : फोटोग्राफरचा प्रमुख आधार असलेला लग्न हंगाम कोरोनामुळे प्रभावित झाल्याने फोटोग्राफर बांधवांच्या चेहºयावर चिंता पसरली आहे. लग्न हंगामातून होणाºया उलाढाली फोटोग्राफरच्या वार्षिक व्यवहारांचा पाया असतो, अशा स्थितीत लग्न हंगामालाच बसलेला फटका फोटोग्राफर बांधवांची आर्थिक घडी विस्कटविणारा ठरतो आहे.

करमाळा तालुक्यातील पोथरे येथील राज स्टुडिओचे प्रमुख राज झिंझाडे हे देखील अडचणीत आलेल्या फोटोग्राफरपैकी एक आहेत. शेतकरी कुटुंबातील असणाºया झिंझाडे यांनी सततचा दुष्काळ व नापिकीला कंटाळून वेगळी वाट म्हणून आपल्या छंदातून फोटोग्राफी व्यवसायाला सुरुवात केली. दरम्यानच्या काळात फोटोग्राफी व्यवसायात होणारे बदल, स्पर्धा, नवनवीन आधुनिक सामुग्रीचा होणारा वापर या पार्श्वभूमीवर झिंझाडे यांनी स्पर्धेत टिकण्यासाठी व २०२० च्या लग्न हंगामाची तयारी म्हणून महिनाभरापूर्वी उसनवारीच्या माध्यमातून अडीच लाख रुपयांची जुळवाजुळव करत दोन लाख रुपयांचा कॅमेरा व पन्नास हजार रुपयांचे साहित्य खरेदी केले.

लग्न हंगाम चांगला होऊन आर्थिक उलाढाल झाल्यावर कॅमेºयासाठी गुंतवलेले पैसे वसूल होतील, अशी आशा बाळगून झिंझाडे यांनी लग्न आॅर्डरी घेण्यास सुरुवात केली. मात्र दुर्दैवाने कोरोनाचे संकट कोसळून लॉकडाउन व जमावबंदी सुरू झाली. त्यातच कोरोनाला रोखण्यासाठी जमावबंदी आवश्यक असल्याने लग्नासारखे समारंभ थांबले. परिणामी फोटोग्राफर झिंझाडे अडचणीत अडकले. 

सद्यस्थितीचा विचार करता, धूमधडाक्यातील लग्न समारंभ सुरू व्हायला किती वेळ लागेल, हे अनिश्चित असल्याने फोटोग्राफरचा व्यवसाय रुळावर येण्यासही वेळच लागणार हे निश्चित आहे. या पार्श्वभूमीवर लग्न हंगाम तयारीसाठी झिंझाडे यांनी कॅमेरा व इतर साहित्यासाठी उसनवारीने गुंतविलेले अडीच लाख रुपये वसूल कधी व कसे होणार, हा प्रश्न त्यांच्यापुढे निर्माण झाला असून, आर्थिक अडचणीत वाढ झाली आहे. अशा स्थितीत तुम्हीच सांगा, आता करायचं काय? हाच प्रश्न समोर आला आहे.

उपासमारीची आली वेळ..
- सुखाचे क्षण टिपणारे दु:खात, वेगवेगळ्या सुखाच्या, जल्लोषाच्या कार्यक्रमात आम्ही फोटोग्राफर इतरांचे सुखाचे क्षण टिपतो. सदर क्षण टिपताना आम्ही नेहमीच आमच्या अडचणींचा विचार करत नाही. मात्र लॉकडाउनमुळे निर्माण झालेली सद्यस्थिती व संकटात आलेले लग्न हंगाम आमच्यापुढे दु:ख निर्माण करणारे ठरलेत. कोरोनामुळे यंदाचा लग्न हंगाम रद्द झाला आहे. त्यामुळे फोटोग्राफर बांधवांचे आर्थिक चक्र विस्कळीत झाले आहे. उपासमारीची वेळ आलीय. अशी प्रतिक्रिया आरणे स्टुडिओचे बबन आरणे, बिग बी स्टुडिओचे बलराज परदेशी, महेंद्र आर्टसचे महेंद्र मांडगे, माऊली स्टुडिओचे ज्ञानदेव पुराणे, नागेश सातपुते, सुधीर कोतमिरे, बापू पवार यांनी दिली आहे.

फोटोग्राफर हे कलाप्रियतेने फोटोग्राफी व्यवसायात आलेले असतात. अशा स्थितीत बहुतेकदा ते आर्थिक अडचणींचा सामना करत व्यवसाय सांभाळतात. अलीकडे मोबाईल फोटोग्राफीचा फटका व्यवसायाला बसत असताना रोजंदारी मिळणेही काहींसाठी अवघड बनलेय. याशिवाय दुकानांची भाडे रक्कमही अनेकांना परवडत नाही. एकूणच विविध अडचणींना तोंड देत असतानाच आता कोरोनामुळे व्यवसाय जागेवरच थांबला आहे.
- बलराज परदेशी, करमाळा

Web Title: Result of lockdown: Photographers grieving the moments of happiness

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.