राजकीय नेत्यांना वाळूज गावात न येऊ देण्याचा ठराव
By रूपेश हेळवे | Updated: October 31, 2023 17:45 IST2023-10-31T17:45:12+5:302023-10-31T17:45:35+5:30
ठराव ग्रामसभेमध्ये सरपंच डॉ. प्रियंका खरात यांच्या अध्यक्षतेखाली झाला.

राजकीय नेत्यांना वाळूज गावात न येऊ देण्याचा ठराव
वाळूज : मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी मोहोळ येथील वाळूज येथे सकाळी दहा वाजता मोहोळ - वैराग रोडवर टायर पेटवून सरकारचा निषेध करण्यात. जो पर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत गावात कुठल्याही राजकीय व्यक्तींना गावात न येऊ देता व राजकीय कार्यक्रमांना उपस्थित राहू नये, असा ठराव ग्रामसभेमध्ये सरपंच डॉ. प्रियंका खरात यांच्या अध्यक्षतेखाली झाला.
यावेळी राहुल मोटे, दिपक मोटे, मधुकर घाडगे, बाबा कादे, आणासाहेब कादे, जयवंत जाधव, कल्याण मोटे, बाबासाहेब मोटे, शुभम ठोंगे, बबलू धुमाळ, समाधान कादे, दत्ता नगूरकर, संतोष मोटे, प्रकाश कादे उपस्थित होते. यावेळी एक मराठा लाख मराठाच्या घोषणा देण्यात आला. जो पर्यंत आरक्षण मिळत नाही तो पर्यंत आंदोलन थांबवणार नाही, असे मत आंदोलन कर्त्यांनी व्यक्त केले.