भगतसिंह कोश्यारींना राज्यपाल पदावरुन हटवा, सोलापूर बंदची हाक
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2022 13:08 IST2022-12-12T13:08:03+5:302022-12-12T13:08:48+5:30
शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाचे अध्यक्ष शेखर फंड यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत सांगितले.

भगतसिंह कोश्यारींना राज्यपाल पदावरुन हटवा, सोलापूर बंदची हाक
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांंना राज्यपाल पदावरून दूर करण्यात यावे या मागणीसाठी १६ डिसेंबर रोजी सोलापूर बंद पुकारण्यात आल्याचे शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाचे अध्यक्ष शेखर फंड यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत सांगितले.
फंड म्हणाले, राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि भाजपचे नेते छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याविरुद्ध आक्षेपार्ह वक्तव्ये करीत आहेत. बहुजन समाजाच्या भावना दुखावल्या आहेत. वादग्रस्त वक्तव्ये करणाऱ्या नेत्यांना पदावरून दूर करण्यात यावे या मागणीसाठी बंद पुकारण्यात आला आहे.