सोलापूरच्या आरोग्य विभागातील भरतीला लागला ब्रेक; कारण जाणून घेण्यासाठी बातमी वाचा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2021 12:56 IST2021-06-29T12:55:32+5:302021-06-29T12:56:46+5:30
सोलापूर लोकमत ब्रेकींग

सोलापूरच्या आरोग्य विभागातील भरतीला लागला ब्रेक; कारण जाणून घेण्यासाठी बातमी वाचा
सोलापूर: झेडपीच्या आरोग्य विभागातील रिक्त पदाबाबत जाहीर करण्यात आलेली भरती काही काळासाठी पुढे ढकलण्यात येत असल्याचे ग्रामविकास विभागाच्या अवर सचिवांनी परिपत्रक जारी केले आहे.
झेडपीच्या आरोग्य विभागातील पाच संवर्गातील पदांसाठी यापूर्वी भरती जाहीर करण्यात आली होती. सर्वेाच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्याने व अनुकंपाच्या २० टक्के भरतीमुळे आरक्षणात मोठा बदल होणार आहे. यानुसार नवीन पदभरती करण्यासाठी वेळ लागणार असल्याने यापूर्वी २६ जूनच्या शुद्धीपत्रकाद्वारे जाहीर झालेली भरतीची प्रक्रिया पुढे ढकलण्यात येत असल्याचे नमूद करण्यात आले आहे.