या कारणामुळे सोलापुरातील तरूणाने सहायक पोलीस निरीक्षकाला खुर्ची फेकून मारली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2020 15:38 IST2020-08-25T15:35:02+5:302020-08-25T15:38:43+5:30
सोलापुरातील घटना; तरूणाविरूध्द सोलापूर शहर पोलीस दलात गुन्हा दाखल

या कारणामुळे सोलापुरातील तरूणाने सहायक पोलीस निरीक्षकाला खुर्ची फेकून मारली
सोलापूर : मी काकाचा माणूस आहे, माझी गाडी परत द्या; अन्यथा तुम्हाला बघून घेतो, अशी धमकी देत सहायक पोलीस निरीक्षक रोहन खंडागळे यांना मारहाण केल्याप्रकरणी तरूणावर सलगर वस्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. ही घटना रविवारी घडली. निखिल जगन्नाथ गायकवाड (वय २६, रा. सेटलमेंट फ्री कॉलनी नं. ६) असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे.
दि.२१ रोजी नाकाबंदी दरम्यान निखिल गायकवाड यांना पोलिसांनी अडवले होते. तोंडाला मास्क नसल्याने त्याची विचारणा केली असता, त्याने पोलिसांसमवेत उद्धट वर्तन केले. मोटार सायकलची कागदपत्रे नसल्याने ११०० रुपयाचा दंड भरावा लागेल, असे पोलिसाने सांगितल्यानंतर त्याने मी पैसे भरणार नाही असे तो म्हणाला. त्याला पोलीस ठाण्यात आणले. तेथे निखिलने खंडागळे यांच्या दिशेने खुर्ची फेकून मारली. हातातील कडे मुठीमध्ये धरून खंडागळे यांच्या हातावर व पायावर ठोसे मारले.