शहरं
Join us  
Trending Stories
1
Priya Marathe Passes Away: लोकप्रिय अभिनेत्री प्रिया मराठेचं निधन, कॅन्सरशी झुंज ठरली अपयशी
2
"१० वर्षे सत्तेत होता, खोलात जायला लावू नका"; आरक्षणावरुन शरद पवारांच्या सल्ल्यावर अजितदादांचे प्रत्युत्तर
3
रोहित शर्माची झाली फिटनेस टेस्ट; ऑस्ट्रेलियाविरूद्ध वनडे मालिकेत खेळणार की नाही? जाणून घ्या
4
LPG, ITR ते क्रेडिट कार्ड... १ सप्टेंबरपासून ‘या’ ७ गोष्टींचा तुमच्या खिशावर होणार थेट परिणाम
5
"माझा प्रॉब्लेम आहे, मंगळसूत्र चोरांच्या विरोधात मी लढत नाही"; जयंत पाटलांनी गोपीचंद पडळकरांना डिवचलं
6
कहानी में ट्विस्ट! शांततेच्या नोबेल पुरस्कारासाठी मेलानिया ट्रम्प यांच्या नावाचे नामांकन?
7
आजचे राशीभविष्य, ३१ ऑगस्ट २०२५ : आजचा दिवस शुभ फलदायी, धन लाभ होईल, मानसिक शांतता लाभेल !
8
Mumbai Police: मुंबई पोलीस, गुन्हे शाखेच्या पोलिसांच्याही सुट्ट्या रद्द!
9
शेकडो टॉयलेट, ११ टँकर, ४५० कर्मचारी; आंदोलकांची गैरसोय टाळण्यासाठी महापालिकेकडून उपाययोजना
10
हलगीचा ताल, झांजेच्या झंकाराने निनादले रस, आंदोलकांचा नाचत जल्लोष 
11
maratha andolan: आझाद मैदानात चिखलात बसून आंदोलन
12
Manoj Jarange: "...तर एकही मराठा घरी दिसणार नाही" जरांगे पाटलांचा इशारा
13
Uddhav Thackeray: सरकारने तुमच्या मागण्यांबाबत...; उद्धव ठाकरेंचा जरांगेंना फोन!
14
येमेनमध्ये इस्रायलच्या हवाई हल्ल्यात हुथी सरकारचे पंतप्रधान अहमद अल-राहवी ठार
15
केंद्र सरकारच्या GST सुधारणांना विरोधी पक्षांचा पाठिंबा, पण..; जयराम रमेश स्पष्टच बोलले
16
BREAKING: मनोज जरांगेंना तिसऱ्या दिवशीही आझाद मैदानात आंदोलनास परवानगी
17
प्रेमप्रकरणातून आंबा घाटात तरूणीचा खून; मृतदेह दरीत फेकून दिला
18
'कोणता कायदा रोज अर्ज करण्यास सांगतो?'; रोजच्या परवानगीच्या अटीमुळे मनोज जरांगे पोलिसांवर चिडले
19
ITR साठी आयकर विभाग मेसेज पाठवतं, वार्षिक उत्पन्न ३ लाख रुपये असणाऱ्यांनी फाइल करावी का?
20
मोठी बातमी! मनोज जरांगे यांच्या मुंबईतील आंदोलनात सहभागी तरुणाचा मृत्यू

राम मंदिर ना भाजपाचा, ना संघाचा मुद्दा, ती तर प्रत्येक हिंदूची भावना : चंद्रकांत पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2018 12:24 IST

बार्शी : अयोध्येतील राम मंदिराचा प्रश्न सध्या शिवसेनेने उचलून धरत ‘पहले मंदिर, फिर सरकार’ असा नारा दिला आहे. राम ...

ठळक मुद्देराज्यातील राजकीय सर्व्हे पाहता काँग्रेस-राष्टÑवादीला एकत्र आल्याशिवाय पर्याय नसल्याचे रिपोर्ट आहेत - महसूल मंत्रीराम मंदिर उभारले पाहिजे, हे प्रत्येक हिंदूचे स्वप्न - महसूल मंत्री

बार्शी : अयोध्येतील राम मंदिराचा प्रश्न सध्या शिवसेनेने उचलून धरत ‘पहले मंदिर, फिर सरकार’ असा नारा दिला आहे. राम मंदिर हा ना भाजपचा मुद्दा आहे, ना राष्टÑीय स्वयंसेवक संघाचा. तो प्रत्येक हिंदूचा मुद्दा आहे. जो गुणाने हिंदू आहे, म्हणजे जो देशावर प्रेम करतो, इथल्या मातीवर प्रेम करतो तो मुसलमान हादेखील हिंदूच आहे, असे मत महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले. 

बार्शी येथे सोमवारी आले असता, ते बोलत होते. महसूल मंत्री पाटील म्हणाले, राम मंदिर उभारले पाहिजे, हे प्रत्येक हिंदूचे स्वप्न आहे. त्यामुळे ते शिवसेनेच्या माध्यमातून झाले तर गैर काय? शेवटी मंदिर होणे गरजेचे आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील काँग्रेस-राष्टÑवादी आघाडीच्या जागा वाटप झाल्या आहेत. मात्र अद्याप शिवसेना-भाजपाच्या युतीचा निर्णय झाला नाही. ज्यांना जादा भीती वाटते, ते सर्वप्रकारची अ‍ॅडजेस्टमेंट करतात.

राज्यातील राजकीय सर्व्हे पाहता काँग्रेस-राष्टÑवादीला एकत्र आल्याशिवाय पर्याय नसल्याचे रिपोर्ट आहेत. २०१४ साली काँग्रेस-राष्टÑवादी विधानसभेला विरोधात लढले होते, त्याचा फटका त्यांना बसला. यावेळी आघाडी नाही झाली तर त्याचा फटका विशेषत: राष्टÑवादीला जादा बसेल. २०१४ साली राज्यात राष्टÑवादीचे ४१ आमदार निवडून आले होते. आता मात्र काँग्रेस व राष्ट्रवादी स्वतंत्र लढल्यास राष्टÑवादीचे १० आमदारसुद्धा येतील की नाही शंका आहे. या उलट काँग्रेसची पाळेमुळे घट्ट आहेत, असे सांगत राष्टÑवादीवर निशाणा साधला.

राज्यातील सेना नेते म्हणतात, सध्या शिवसेना व भाजपात ‘आम्ही काय कुणाचे खातो, तो राम आम्हाला देतो,’ अशा विचारांची व अहंमभावना असलेले कार्यकर्ते आहेत. त्यांना सत्ता कोणाचीही येवो, त्याशी काही घेणे-देणे नाही. शेवटी शिवसेना काय? भाजपा किंवा अन्य राजकीय पक्ष काय, ही सारी माया आहे. मात्र भाजपा युतीसाठी प्रयत्नशील आहे. शेवटी जे ठरेल ते होईल. भाजपाचा पाया भक्कम आहे. त्यामुळे राज्यात व देशात पक्ष बॅकफूटवर कधीही नव्हता, तो जाणार नाही, असा विश्वासही नामदार पाटील यांनी व्यक्त केला.

युती न झाल्यास स्वतंत्र लढूच्आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टी-शिवसेना युती झाली पाहिजे, असा भाजपाचा सद्यस्थितीत मूड असून, ज्या मतदारसंघात शिवसेनेच्या विद्यमान खासदार आहेत त्या ठिकाणी भाजपा दावा करणार नाही. उगाच जागा वाटपावरून भांडणे नकोत. मात्र युती झाली नाही, तर भाजपा स्वतंत्रपणे निवडणुकांना सामोरे जाईल, असे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. 

बार्शी मंडळाचा दुष्काळात समावेश करूच्राज्याची आर्थिक स्थिती चांगली आहे. बार्शी ते कुर्डूवाडी रस्त्याचे काम मार्गी लावले. यासारख्या लोकहिताच्या कामांची मागणी बार्शीकरांनी केल्यास ती निश्चित पूर्ण करू. बार्शी शहर मंडळाचा समावेश दुष्काळी मंडळात करण्यासाठी जिल्हाधिकाºयांनी त्या संबंधीचा अहवाल पाठविल्यानंतर बार्शी मंडळाचा दुष्काळी मंडळात समावेश करू, असे पाटील यांनी सांगितले.

टॅग्स :Solapurसोलापूरchandrakant patilचंद्रकांत पाटीलShiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेसcongressकाँग्रेस