सरकार आणि न्यायालयाच्या निर्णयानंतरच राम मंदिर; रावसाहेब दानवेंचं स्पष्टीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2019 15:21 IST2019-01-16T15:19:27+5:302019-01-16T15:21:20+5:30
सोलापूर : पहले सरकार की पहले राममंदिर याचे उत्तर असे देता येणार नाही. सरकार आणि न्यायालयाच्या निर्णयानंतर राम मंदिर ...

सरकार आणि न्यायालयाच्या निर्णयानंतरच राम मंदिर; रावसाहेब दानवेंचं स्पष्टीकरण
ठळक मुद्देसोलापूर लोकसभा मतदारसंघातील तयारीचा आढावा घेण्यासाठी दानवे सोलापुरातसरकार आणि न्यायालयाच्या निर्णयानंतर राम मंदिर होईल, असे स्पष्टीकरण भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी बुधवारी सोलापुरात दिले.
सोलापूर : पहले सरकार की पहले राममंदिर याचे उत्तर असे देता येणार नाही. सरकार आणि न्यायालयाच्या निर्णयानंतर राम मंदिर होईल, असे स्पष्टीकरण भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी बुधवारी सोलापुरात दिले.
सोलापूर लोकसभा मतदारसंघातील तयारीचा आढावा घेण्यासाठी दानवे सोलापुरात आले होते. यावेळी त्यांनी मंडल पदाधिकाºयांची बैठक घेतली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
शिवसेनेने पहिले राममंदिर फिर सरकार अशी घोषणा दिली आहे. त्याबद्दल पत्रकार परिषदेत विचारलेल्या प्रश्नावर दानवे म्हणाले, याच उत्तर अस देता येणार नाही. सरकार आणि न्यायालयाच्या निर्णयानंतरच रामंदिर होईल.