शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

स्वतंत्र लिंगायत धर्मासाठी एक सप्टेंबरला पुण्यात महामोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2019 15:49 IST

लोकप्रतिनिधींच्या घरांसमोर आंदोलन; समन्वय समितीच्या बैठकीत निर्धार

ठळक मुद्देसमन्वय समितीची बैठक सकाळी मातोश्री स्व. सिद्धव्वाबाई हत्तुरे सांस्कृतिक भवनात घेण्यात आलीस्वतंत्र लिंगायत धर्माच्या मागणीसाठी आजपर्यंत अनेक आंदोलने करण्यात आलीतरीही पदरात काहीच पडेना म्हणून आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्यात आली

सोलापूर : स्वतंत्र लिंगायत धर्माच्या मागणीसाठी येत्या एक सप्टेंबर रोजी पुण्यात अखिल भारतीय लिंगायत समन्वय समितीच्या वतीने महामोर्चा काढण्यात येणार आहे. त्यानंतर राज्यातील सर्वच आमदार-खासदारांच्या घरांसमोर धरणे आंदोलन करण्याचा निर्णय रविवारी सकाळी झालेल्या राज्यव्यापी बैठकीत घेण्यात आला. 

समन्वय समितीची बैठक सकाळी मातोश्री स्व. सिद्धव्वाबाई हत्तुरे सांस्कृतिक भवनात घेण्यात आली. स्वतंत्र लिंगायत धर्माच्या मागणीसाठी आजपर्यंत अनेक आंदोलने करण्यात आली. तरीही पदरात काहीच पडेना म्हणून आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्यात आली. समितीचे महासचिव विजयकुमार हत्तुरे यांनी या बैठकीचे आयोजन केले होते. 

बंगळुरुचे पूज्य चन्नबसवानंद महास्वामी म्हणाले, नागमोहनदास समितीच्या अहवालानुसार लिंगायत समाजाला स्वतंत्र धर्माची मान्यता मिळाली पाहिजे. नागमोहनदास समितीचा अहवाल कोणीच नाकारु शकत नाही. दास समितीचा अहवाल केंद्र सरकारने स्वीकारला पाहिजे. पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रत्येक भाषणात महात्मा बसवेश्वरांचे विचार अन् तत्त्वे मांडतात. मात्र त्यांच्या संकल्पनेतील लिंगायत धर्माला त्यांनी मान्यता द्यायला हवी. 

केंद्राने नागमोहनदास समितीच्या अहवालाचा अभ्यास करण्यासाठी १० तज्ज्ञांची नियुक्ती केली पाहिजे, अशी मागणीही चन्नबसवानंद महास्वामी यांनी केली.

प्रारंभी समितीचे महासचिव विजयकुमार हत्तुरे यांनी उपस्थितांचे स्वागत करुन, प्रास्ताविक केले. यावेळी डॉ. शिवलिंग शिवाचार्य, पूज्य डॉ. बसवलिंग पट्टदेवरु, जयमृत्युंजय महास्वामी, पूज्य शरणबसवलिंग महास्वामी, पूज्य माता महानंदाताई स्वामी आदी विविध मठांचे मठाधिपती, लिंगायत समाजातील मान्यवर आणि समितीचे पदाधिकारी, सदस्य उपस्थित होते.  आभार राजाराम पाटील यांनी मानले.  राज्यव्यापी बैठक यशस्वी करण्यासाठी सकलेश बाभुळगावकर, अजिंक्य उप्पीन, नागेश पडणुरे, धोंडप्पा तोरणगी, लिंगय्या स्वामी, विवेक हत्तुरे, प्रसाद चोरगी, ओंकार हत्तुरे  यांनी परिश्रम घेतले. 

संघर्ष करत राहणार- शिवलिंग शिवाचार्य- स्वतंत्र लिंगायत धर्माच्या मागणीसाठी आजपर्यंत समितीचा संघर्ष सुरु आहे. तो याहीपुढे राहणार नाही. जोपर्यंत स्वतंत्र लिंगायत धर्मास मान्यता मिळत नाही, तोपर्यंत संघर्ष अधिक तीव्र करु, असा इशारा देताना डॉ. शिवलिंग शिवाचार्य यांनी लिंगायत समाजातील काही राजकारण्यांना राजकारण समजत नसल्याचे नमूद केले. तुमचा स्वाभिमान कुठे गेला, जो पक्ष आपली मागणी पूर्ण करीत नाही, त्या पक्षामागे जाऊ नका, असा सल्लाही डॉ. शिवलिंग शिवाचार्य यांनी दिला. 

टॅग्स :SolapurसोलापूरLingayat Mahamorchaलिंगायत महामोर्चाPuneपुणेNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपा