Raju Shetty of 'Swabhimani' dies; Criticism of Praveen Darekar | 'स्वाभिमानी' चे राजु शेट्टी यांच्यामधील शेतकरी मेला; प्रवीण दरेकर यांची बोचरी टीका

'स्वाभिमानी' चे राजु शेट्टी यांच्यामधील शेतकरी मेला; प्रवीण दरेकर यांची बोचरी टीका

पंढरपूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेते राजु शेट्टी यांच्या मधील शेतकरी मेला आहे, अशी बोचट टीका विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी केले आहे.

पंढरपूर तालुक्यातील पुरामुळे नुकसान झालेल्या भागाची पाहणी करण्यासाठी विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर आले होते. यावेळी आ. गोपीचंद पडळकर, आ. प्रशांत परिचारक, भाजपाचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख उपस्थित होते.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी हे पंढरपूर आल्यानंतर केंद्र सरकारने ज्याप्रमाणे बिहारला मदत तत्काळ मदत केली त्याचप्रमाणे महाराष्ट्राला का करत नाही. असा सवाल भाजपला पत्रकार परिषदे दरम्यान केला होता.

याला उत्तर देताना विरोधी पक्षनेत प्रवीण दरेकर म्हणाले की, स्वाभिमानी अध्यक्ष राजु शेट्टी शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांवर आवाज उठवत होते, परंतु सध्या त्यांना सत्ताधारी पक्षाकडून विधान परिषद मिळणार यामुळे ते आंदोलन करताना दिसून येत नाही. राजू शेट्टी यांच्या मधील शेतकरी मेला असल्याची टीका प्रवीण दरेकर यांनी केली.

Web Title: Raju Shetty of 'Swabhimani' dies; Criticism of Praveen Darekar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.