राजेंद्र भारूड यांची नंदूरबारच्या जिल्हाधिकारीपदी बदली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2019 18:04 IST2019-07-16T18:04:08+5:302019-07-16T18:04:44+5:30
दोन वर्षापुर्वी घेतला होता पदभार; शासनाच्या योजना गतीमानतेने राबविण्याचा भारूड पॅटर्न राज्यात टॉपवर

राजेंद्र भारूड यांची नंदूरबारच्या जिल्हाधिकारीपदी बदली
सोलापूर : सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ़ राजेंद्र भारूड यांची नंदुरबारचे जिल्हाधिकारी म्हणून पदोन्नतीने बदली झाली आहे.
दोन वर्षापुर्वी डॉ. भारूड यांनी सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून पदभार घेतला. शासनाच्या अनेक योजना त्यांनी जलदगतीने राबविल्या़ प्रधानमंत्री घरकुल योजनेचे काम राज्यात अग्रेसर ठेवले. गटारमुक्त गाव करण्यासाठी शोषखड्डे घेण्याचा पथदर्शी प्रकल्प त्यांनी सोलापूर जिल्ह्यात राबविला़ या प्रकल्पाची केंद्रस्तरावरून दखल घेण्यात आली होती. त्याचबरोबर शिक्षण, आरोग्य व महिला बालकल्याण विभागातील अनेक प्रकल्प त्यांनी यशस्वीपणे राबविले.
आषाढी वारीतील पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचा उपक्रम कौतुकास्पद ठरला़ यासाठी त्यांना नाशिक येथील कुंभमेळाव्याच्या अभ्यासासाठी निवड झाली होती़ त्यांच्या बदलीमुळे आता नवीन मुख्य कार्यकारी अधिकारीपदी कोण येणार याकडे साºयाचे लक्ष लागले आहे़