राज ठाकरेंनी त्यांच्या भूमिकेवर ठाम राहावे - रामदास आठवले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2018 09:53 IST2018-11-15T09:50:17+5:302018-11-15T09:53:04+5:30
केंद्रीय मंत्री रामदास आठवले आज पंढरपूर दौऱ्यावर

राज ठाकरेंनी त्यांच्या भूमिकेवर ठाम राहावे - रामदास आठवले
पंढरपूर : उत्तर भारतीयांना राज ठाकरेंनी आजपर्यंत कडाडून विरोध केलेला आहे परंतु त्यांना सदबुद्धी मिळाल्याने ते आता उत्तर भारतीयांची जवळीक साधत आहेत. यापुढेही त्यांनी त्यांच्या भूमिकेवर ठाम राहून, उत्तर भारतीयांशी अशीच जवळीक ठेवावी असे मत सामाजिक व न्याय केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केले आहे.
केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी पंढरपूर येथे पत्रकार परिषदेत पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी महामंडळाचे अध्यक्ष राजाभाऊ सरवदे, रिपाइं ज्येष्ठ नेते सुनील सर्वगोड, विधीतज्ञ कीर्तीपाल सर्वगोड, जिल्हाध्यक्ष अशोक सरवदे उपस्थित होते.
पुढे आठवले म्हणाले, महाराष्ट्रातील मराठी जनता देखील विविध राज्यात राहते त्यांचे रक्षण होणे गरजेचे आहे. यामुळे राज ठाकरे ने देखील महाराष्ट्रात इतर प्रांतातून आलेल्या जनतेच्या इतर भाषिक लोकांच्या पाठीशी उभे राहणे गरजेचे आहे. व त्यांनी त्यांच्या भूमिकेवर ठाम राहावे. असे आठवले म्हणाले.