भविष्यात इथेनॉल व डिस्टिलरी प्रकल्प उभा करणार, खासदार धनंजय महाडिक यांची माहिती, भीमा सहकारी साखर कारखान्याच्या वचनपूर्ती सोहळा उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2018 02:37 PM2018-03-01T14:37:44+5:302018-03-01T14:37:44+5:30

अतिरिक्त उसाचा प्रश्न कायमचा सुटला असून  उपपदार्थ निर्मिती करून शेतकºयांना त्यांच्या उसाला योग्य मोबदला या प्रकल्पामुळे मिळण्यास मदत होईल. भविष्यात इथेनॉल व डिस्टिलरी प्रकल्पही भीमा कारखाना राबवेल.

Raising of ethanol and distillery projects in future, information of MP Dhananjay Mahadik, encouraged by Bhima Co-operative Sugar Factory | भविष्यात इथेनॉल व डिस्टिलरी प्रकल्प उभा करणार, खासदार धनंजय महाडिक यांची माहिती, भीमा सहकारी साखर कारखान्याच्या वचनपूर्ती सोहळा उत्साहात

भविष्यात इथेनॉल व डिस्टिलरी प्रकल्प उभा करणार, खासदार धनंजय महाडिक यांची माहिती, भीमा सहकारी साखर कारखान्याच्या वचनपूर्ती सोहळा उत्साहात

googlenewsNext
ठळक मुद्देटाकळी सिकंदर येथील भीमा सहकारी साखर कारखान्यावर २५ मेगावॅट सहवीजनिर्मिती व प्रतिदिन पाच हजार मेट्रिक टन गाळप क्षमता प्रकल्पाचा शुभारंभ ५ हजार मेट्रिक टन गाळप क्षमतेच्या गव्हाणीचे पूजन ज्येष्ठ संचालक विष्णुपंत महाडिक, उद्धव  डोंगरे, भाऊसाहेब चव्हाण, विष्णू पवार व शिवाजी चवरे, सभासदांसह  खा. महाडिक यांनी केले


आॅनलाइन लोकमत सोलापूर
कुरुल दि १  : ‘तुम्ही मला सत्ता द्या, मी तुमच्या अडचणी सोडवतो’, या माझ्या शब्दावर विश्वास ठेवून सभासदांनी आमच्या हाती भीमा कारखान्याची सूत्रे दिली़ आम्ही २०११ च्या निवडणुकीत दिलेल्या २१ कलमी आश्वासनांची वचनपूर्ती आणि स्वर्गीय भीमरावदादांचे स्वप्न आज  साकार झाले आहे.  अतिरिक्त उसाचा प्रश्न कायमचा सुटला असून  उपपदार्थ निर्मिती करून शेतकºयांना त्यांच्या उसाला योग्य मोबदला या प्रकल्पामुळे मिळण्यास मदत होईल. भविष्यात इथेनॉल व डिस्टिलरी प्रकल्पही भीमा कारखाना राबवेल असे प्रतिपादन भीमा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष खा. धनंजय महाडिक यांनी केले.
टाकळी सिकंदर येथील भीमा सहकारी साखर कारखान्यावर २५ मेगावॅट सहवीजनिर्मिती व प्रतिदिन पाच हजार मेट्रिक टन गाळप क्षमता प्रकल्पाचा शुभारंभ खा़ धनंजय महाडिक यांच्या हस्ते झाला़ त्यावेळी ते बोलत होते़ यावेळी जिल्हा परिषदेच्या अर्थ व बांधकाम समितीचे सभापती विजयराज डोंगरे, भीमाचे माजी उपाध्यक्ष कल्याणराव पाटील, मातोश्री मंगलाताई महाडिक, पृथ्वीराज महाडिक, बबनराव महाडिक,  सभापती समता गावडे, उपसभापती साधना देशमुख, राजेश पवार, शिवाजीराव गुंड, तानाजीराव गुंड, जि़ प़ सदस्य तानाजीराव खताळ, पवन महाडिक, प्रबंधक प्रेमकुमार त्रिपाठी, अनुराग उप्पीन, हरिदास थिटे, अशोक सरवदे, धोंडिबा उन्हाळे, अ‍ॅड़ रामलिंग कोष्टी, भीमाचे उपाध्यक्ष सतीश जगताप, श्रीधर बिरजे, कार्यकारी संचालक शरद बेल्हेकर, लहू आवताडे, रमाकांत पाटील, बाबासाहेब जाधव, सुनील चव्हाण,  ज्ञानेश्वर जाधव, संग्राम चव्हाण आदी उपस्थित होते़ प्रारंभी संचालक बिभिषण वाघ यांनी सपत्नीक वास्तूपूजन व सत्यनारायण महापूजा केली. तर ५ हजार मेट्रिक टन गाळप क्षमतेच्या गव्हाणीचे पूजन ज्येष्ठ संचालक विष्णुपंत महाडिक, उद्धव  डोंगरे, भाऊसाहेब चव्हाण, विष्णू पवार व शिवाजी चवरे, सभासदांसह  खा. महाडिक यांनी केले व गव्हाणीत उसाची मोळी टाकून शुभारंभ केला. 
यावेळी हरिभाऊ काकडे, बाळासाहेब पवार, संचालिका सिंधूताई जाधव, विजयालक्ष्मी रणदिवे, संचालक रामहरी रणदिवे, प्रभाकर देशमुख, अनिल गवळी, गणपत पुदे, बापू चव्हाण, बापू जाधव, दादासाहेब शिंदे, तुषार चव्हाण, बापू गवळी, राजेंद्र टेकळे, युवराज चौगुले, राजाराम बाबर, भारत पाटील, झाकीर मुलाणी, माणिक बाबर, सुधीर भोसले, माधव चव्हाण, तानाजी पाटील, सुरेश शिवपुजे, पांडुरंग बचुटे, सौदागर खडके, निंबाळकर, माणिक पाटील, काळे,  बाबुराव जाधव, दत्ता पाटील, भाऊसाहेब जगताप, अंकुश जगताप उपस्थित होते. प्रास्ताविक उपाध्यक्ष सतीश जगताप यांनी केले. यावेळी संचालक प्रभाकर देशमुख, प्रा़ ज्ञानेश्वर जाधव, प्रा. संग्राम चव्हाण यांची भाषणे झाली. सूत्रसंचालन पांडुरंग ताठे यांनी केले तर आभार संचालक तुषार चव्हाण यांनी मानले़
---------------------
- गुढीपाडव्याला सभासदांना ३० किलो साखर देणार
- दराच्या बाबतीत इतर कोणत्याही कारखान्यापेक्षा एक रुपयाही कमी देणार नाही़
- कार्यक्षेत्रातील नवीन ३० गावातील शेतकºयांना सभासद करून घेणार
- भविष्यात इथेनॉल व डिस्टिलरी प्रकल्प उभारण्यात येणार 
-  ऊस उत्पादक शेतकºयांनी ठिबकद्वारे नवीन तंत्रज्ञान वापरून उत्पादन वाढवावे
- कोल्हापूर लोकसभा निवडणुकीची मला मुळीच काळजी नाही, मी लाखाच्या फरकाने पुन्हा निवडून येणार 

Web Title: Raising of ethanol and distillery projects in future, information of MP Dhananjay Mahadik, encouraged by Bhima Co-operative Sugar Factory

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.