सोलापूर शहर व परिसरात पावसाचे आगमन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2018 16:19 IST2018-04-05T16:19:30+5:302018-04-05T16:19:30+5:30

सोलापूर शहर व परिसरात पावसाचे आगमन
सोलापूर : मागील काही दिवसांपासून उकाडा सहन करणाºया सोलापूरकरांना गुरूवारी दुपारी चारच्या सुमारास पावसाने चांगलाच दिलासा दिला़ सोलापूर शहर व परिसरात पावसाने आगमन केले़ शहरात शिवाजी चौक, विमानतळ, होटगी रोडसह सोलापूर विद्यापीठ, केगांव, कोंडी, उत्तर सोलापूर तालुक्यातील कारंबा, गुळवंची आदी परिसरात पावसाने चांगलीच हजेरी लावली़ दुपारी ४ वाजून १५ मिनिटांनी सैफुल परिसरात गडगडाटासह पावसाने हजेरी लावली़
गुरूवारी सकाळपासून वातावरणात बदल जाणवत होते़ कधी उन्ह तर कधी सावली जाणवत होती़ दुपारी पाऊस येणार अशी शक्यता वर्तविण्यात येत असताना पावसाने हजेरी लावली़