शहरं
Join us  
Trending Stories
1
"हेडगेवारांना कारावास झाला होता, पण...", भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील RSS च्या भूमिकेवर ओवेसींनी उपस्थित केला सवाल
2
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, महापालिका निवडणुकीत नवा वाद; प्रचार संपला तरीही उमेदवारांना...
3
तुम्ही संभाजीनगरचे पालक, पण देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मालक; संजय केनेकर शिरसाटांवर संतापले
4
तुमच्या कुटुंबाचे भविष्य करा सुरक्षित! वर्षाला फक्त २० रुपये भरा आणि मिळवा २ लाखांचे कवच
5
मतदानादिवशी ठाकरे बंधूंचे 'भगवा गार्ड' मैदानात उतरणार, दुबार, बोगस मतदारांना पकडणार आणि...
6
Rohit Sharmaची पत्नी रितिकाच्या हातातल्या महागड्या पर्सची रंगली चर्चा, किंमत ऐकून थक्क व्हाल
7
'या' विमान कंपनीची नवी ऑफर: प्रवाशांना मोठी भेट; मोठ्यांना १,४९९ रुपयांपासून तर मुलांना १ रुपयांत विमान प्रवास
8
Bornhan: मकर संक्रांत ते रथसप्तमी: बाळाची पहिली संक्रांत? मग 'बोरन्हाण' घालताना 'या' गोष्टी ठेवा लक्षात!
9
Travel : एकटं फिरायचंय? टेन्शन सोडा! सोलो ट्रॅव्हलिंगसाठी 'ही' ५ ठिकाणे आहेत सर्वात बेस्ट
10
"हा साप मला चावलाय, माझ्यावर उपचार करा" सापाला खिशात घालून रिक्षा चालकानं गाठलं रुग्णालय
11
'वंदे भारत स्लीपर'चे तिकीट दर पाहून डोळे विस्फारतील! १३,३०० रुपयांपर्यंत, ४०० किमीसाठी ₹१५२०; किलोमीटरनुसार भाडे बदलणार...
12
मोठी बातमी! राज्यातील 'बिनविरोध' निवडीला स्थगिती मिळणार?; उद्या हायकोर्टात तातडीची सुनावणी
13
Harsha Richhariya : "आता बस्स झालं, तुमचा धर्म तुमच्याकडेच ठेवा, मी सीता नाही..."; हर्षा रिछारियाचा मोठा निर्णय
14
Nashik Municipal Election 2026 : बडगुजर-शहाणे यांच्या लढतीमुळे प्रभाग २९ 'हॉटस्पॉट'; काट्याच्या लढतीमुळे रंगत
15
हो… अगदी खरे आहे… ‘वंदे भारत’हून वेगवान, शताब्दीपेक्षा सुपरसेवा; तिकीट फक्त ₹५! कोणती ट्रेन?
16
10 मिनिटांच्या डिलिव्हरीला ब्रेक; झेप्टो, ब्लिंकइट, स्विगीबाबत केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय
17
Happy Makar Sankranti 2026 Wishes: मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Quotes, WhatsApp Status शेअर करत वाढवा सणाचा गोडवा!
18
ट्रम्प यांच्या टॅरिफला सर्वोच्च न्यायालयात आव्हान; उद्या निकाल लागण्याची शक्यता; निर्णय विरोधात गेल्यास काय करणार?
19
महापालिका निवडणुकीत शिंदेसेना, उद्धवसेनेला दोन अंकी आकडा गाठतील का?
20
लॅपटॉपचा कीबोर्ड अचानक बंद झालाय? सर्व्हिस सेंटरला धावण्यापूर्वी करा 'हे' ५ सोपे उपाय; वाचतील हजारो रुपये!
Daily Top 2Weekly Top 5

पावसाच्या पाण्याने बोरामणी येथील शेततळ्यात पावणेदोन कोटी लिटर पाणी भरले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2019 12:12 IST

सोलापूर : सोलापूर म्हटले की दुष्काळी जिल्हा अशी ओळख. यंदा तर ५० टक्केही पाऊस नसल्याने सगळीकडे पाणीटंचाईच. अशा परिस्थितीत ...

ठळक मुद्देबोरामणीच्या शेतकºयाचा उपक्रम वीस एकर द्राक्षबाग बहरली, मुख्यमंत्र्यांनी केले कौतुकपावसाच्या पाण्याने पावसाळ्यात शेततळे भरून घेतले

सोलापूर : सोलापूर म्हटले की दुष्काळी जिल्हा अशी ओळख. यंदा तर ५० टक्केही पाऊस नसल्याने सगळीकडे पाणीटंचाईच. अशा परिस्थितीत दक्षिण सोलापूर तालुक्यातील बोरामणी येथील शेतकरी सिद्राम बिराजदार यांनी एक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल पावणेदोन कोटी लिटर पाण्याचा साठा शेततळ्यात पावसाच्या पाण्याने करून ठेवला आहे. या पाण्यावर बिराजदार यांची वीस एकर द्राक्षबाग बहरत असून त्यांच्या या उपक्रमाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही भरभरून कौतुक केले आहे.

बिराजदार यांनी मागील वर्षी आपल्या शेतात सुमारे अर्धा एकर क्षेत्रात सामूहिक शेततळे योजनेतून तळे बांधले. यासाठी त्यांना तब्बल १५ लाख रुपयांचा खर्च आला आहे. राज्य शासनाचे त्यांना ३ लाख ३९ हजार रुपयांचे अनुदान यासाठी मिळाले आहे. शेततळे पूर्ण झाल्यानंतर उन्हाळ्यात पाण्याची सोय व्हावी, यासाठी बिराजदार यांनी पावसाच्या पाण्याने पावसाळ्यात शेततळे भरून घेतले. त्यानंतर विहीर व बोअरच्या पाण्याचाही साठा याठिकाणी केला. त्यामुळे त्यांच्या आज सुमारे वीस एकर द्राक्षबागेस पाणी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. 

शेततळ्यामधील पाण्याचा आधार असल्याने बिराजदार यांनी सरिता, नानासाहेब, थॉमसन, आर. के., शरद, मणिकर, डबल एस आदी जातींची द्राक्षलागवड केली आहे. यासाठी त्यांनी आतापर्यंत वीस एकर क्षेत्रासाठी तीस ते चाळीस लाख रुपयांचा खर्चही औषधे, मजुरी आदींसाठी केला आहे. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोकसंवाद कार्यक्रमांतर्गत बिराजदार शेतकरी कुटुंबीयांशी व्हिडीओ कॉन्फरन्सने सोमवारी संवाद साधला. सोलापूर जिल्ह्यात ५० टक्क्यांपेक्षा कमी पाऊस असताना शेततळ्याच्या माध्यमातून सुरू असलेल्या बागायती शेतीचे त्यांनी भरभरून कौतुक केले. शेततळे बांधण्यासाठी अनुदान अपुरे असून अनुदान वाढविण्यात यावे, ठिबक सिंचनसाठी शंभर टक्के अनुदान देण्यात यावे, अशी मागणी यावेळी सिद्राम बिराजदार यांचे सुपुत्र आप्पा यांनी मुख्यमंत्री यांच्याकडे केली. मागेल त्याला शेततळे योजना व महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना या दोन्ही योजनांतून शेततळे घेण्याचा मार्ग आता मोकळा असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. बागायतदार शेतकरी सिद्राम यांच्या पत्नी निर्मला यांच्याशीही मुख्यमंत्र्यांनी यावेळी संवाद साधला. 

एक कोटीचे द्राक्ष काढणार - बिराजदार- शेततळ्याच्या पाण्यावर विविध प्रकारच्या जातीचे द्राक्ष उत्पादन घेण्याचा प्रयत्न आमच्याकडून होत आहे. गतवर्षी सुमारे ५० लाख रुपयांची द्राक्षं यु.के व बांगलादेश यासारख्या देशासाठी निर्यात झाली आहेत. यंदाच्या वर्षीही निर्यात होणार असून, यातून सुमारे एक कोटी रुुपये उत्पन्न मिळण्याची अपेक्षा असल्याची प्रतिक्रिया यावेळी आप्पा बिराजदार यांनी दिली. 

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur Collector Officeसोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयFarmerशेतकरीagricultureशेतीWaterपाणीDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसgovernment schemeसरकारी योजना