शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुमचं वक्तव्य लाजिरवाणं, आम्ही हमासचे दहशतवादी मारले", प्रियंका गांधींच्या 'त्या' दाव्यामुळे इस्राइल संतप्त   
2
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
3
खऱ्याखुऱ्या विराट कोहलीने पान टपरीवाल्याला केला कॉल, नंतर पोलीस त्याच्या घरी पोहचले अन्...
4
HDFC-ICICI बँकेच्या शेअर्समुळे बाजार गडगडला! पण, 'या' क्षेत्राने दिली साथ; कशात झाली वाढ?
5
माझा काही संबंध नाही, काँग्रेसने परवानगीशिवाय 'तो' व्हिडिओ वापरला; केके मेननचे स्पष्टीकरण
6
Maharashtra Police Bharti 2025: १५ हजार पोलीस भरतीस मंजुरी; मंत्रिमंडळाच्या बैठकीत ४ महत्त्वाचे निर्णय, वाचा
7
शाओमी YU7 च्या खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड, अवघ्या दोन मिनिटांत ३ लाख बुकींग!
8
१९ वर्षे असते शनि महादशा, ‘या’ राशींना मिळतो अपार पैसा, भाग्योदय; भरभराट, भरघोस लाभच लाभ!
9
धक्कादायक! लोकोपायलटच्या जाग्यावर तिसराच व्यक्ती बसला, मोठा गोंधळ उडाला, अनेकांचा जीव धोक्यात; व्हिडीओ व्हायरल
10
"तिसरं मूल झाल्यास गाय अन् ५०००० रुपयांचं बक्षीस"; घोषणा करणाऱ्या खासदाराचं पंतप्रधान मोदींनी केलं कौतुक!
11
प्रेमविवाहानंतर अवघ्या १० दिवसांत पत्नीचा काटा काढला; पोलीस शिपाई का बनला गुन्हेगार?
12
पैशांचा पाऊस! अदानींच्या संपत्तीत एका दिवसात ५० हजार कोटींची वाढ, टॉप-२० श्रीमंतांच्या यादीत पुन्हा स्थान!
13
Video: एकाच महिलेचं ६ वेळा मतदार यादीत नाव, EPIC क्रमांक वेगळे...; महाराष्ट्रातील प्रकार व्हायरल
14
ना करुण नायर, ना श्रेयस अय्यर, ना साई सुदर्शन... ३ नंबर बॅटिंगसाठी गांगुलीची कुणाला पसंती?
15
एका झटक्यात ₹४००० नं घसरला शेअरचा भाव; शेअर विकण्यासाठी गुंतवणुकदारांच्या रांगा, पाहा कोणता आहे स्टॉक?
16
कोण आहेत १२४ वर्षीय मिंता देवी? ज्यांच्या नावाचं टी-शर्ट घालून विरोधकांचा संसदेत राडा!
17
पंजाब पोलिसांची मोठी कारवाई; बब्बर खालसा संघटनेशी संबंधित ५ दहशतवाद्यांना अटक
18
आसिम मुनीर यांना सारखं अमेरिकेत बोलावून भारतच नव्हे, तर 'या' तीन देशांनाही इशारा देतायत डोनाल्ड ट्रम्प!
19
'परम सुंदरी'च्या रोमँटिक केमिस्ट्रीवर भाळले प्रेक्षक, सिनेमात कॉमेडीचाही तडका; ट्रेलर रिलीज
20
१४, १५ की १६ ऑगस्ट? नेमकी कधी आहे श्रीकृष्ण जन्माष्टमी? पाहा, शुभ मुहूर्त, महत्त्व, मान्यता

रेल्वेत थरारनाट्य; सिग्नलला चिखल फासून चेन्नई एक्स्प्रेस लुटण्याचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2018 12:31 IST

सोलापूर : मुंबईहून निघालेली चेन्नई एक्स्पे्रस चोरट्यांनी सिग्नलला चिखल लावून पोफळज (ता. करमाळा) जवळ थांबवली़ चोरट्यांचा डब्यात घुसण्याचा प्रयत्न आरपीएफ जवानांनी हाणून पाडला़ तसेच या जवानांनी ही एक्स्प्रेस पुढे पाठवून नाटक रचत उसाच्या फडात लपून बसलेल्या सहा जणांपैकी एकाला त्याच्या मोटरसायकलसह पकडले़ पकडलेल्या संशयित चोरट्याचे नाव सुभाष सुरेश पवार (वय ३०, ...

ठळक मुद्देसहा जणांपैकी एकाला त्याच्या मोटरसायकलसह पकडले़ मोटरसायकलसह कुर्डूवाडी आरपीएफच्या हवाली केल्याचे सांगण्यात आले़ 

सोलापूर : मुंबईहून निघालेली चेन्नई एक्स्पे्रस चोरट्यांनी सिग्नलला चिखल लावून पोफळज (ता. करमाळा) जवळ थांबवली़ चोरट्यांचा डब्यात घुसण्याचा प्रयत्न आरपीएफ जवानांनी हाणून पाडला़ तसेच या जवानांनी ही एक्स्प्रेस पुढे पाठवून नाटक रचत उसाच्या फडात लपून बसलेल्या सहा जणांपैकी एकाला त्याच्या मोटरसायकलसह पकडले़ 

पकडलेल्या संशयित चोरट्याचे नाव सुभाष सुरेश पवार (वय ३०, रा़ केडगाव, जेऊर, करमाळा) आहे़  मुंबईहून निघालेली  चेन्नई एक्स्प्रेस  पहाटे २ वाजता पोफळजजवळ आली असता  गाडीचा वेग एकदम कमी झाला़ चालकाला सिग्नल बंद अवस्थेत दिसला़ सिग्नल मिळत नसल्याने गाडी पुढे हलेना़ याचवेळी एका डब्यात पाच-सहा चोरटे  चढण्याचा प्रयत्न करीत होते़ हा प्रकार आरपीएफ जवानांच्या लक्षात आला़ इतर जवान खाली उतरत त्यांना पिटाळून लावले़ सिग्नलजवळ गेले असता त्यावर चिखल लावल्याचे निदर्शनास आले़

दरम्यान, चिखल हटवून या जवानांनी नाट्यमयरित्या या चोरट्यांना पकडण्याचा चंग बांधला़ याचवेळी चालकाने स्टेशनमास्तरांशी संपर्क साधून आरपीएफ जवानांच्या पथकाला पाचारण केले़ पथक दाखल होताच खाली थांबलेल्या जवानांनी कुर्डूवाडीच्या पथकाला गाडीत बसवून पाठवून दिले़ गाडी पुढे निघाली आणि डब्यातून खाली उतरलेले जवान दबा धरुन बसले़

याचवेळी बाजूला असलेल्या उसाच्या फडातून पाच-सहा दरोडेखोर बाहेर आले आणि त्यांच्या मागावर दबा धरुन बसलेल्या आरपीएफ जवानांना पाहताच अंधारात पळ काढला़ या जवानांनी पाठलाग करुन एका संशयित चोरट्याला त्याच्या मोटरसायकलसह पकडले़ या संशयित चोरट्याला त्याच्या मोटरसायकलसह कुर्डूवाडी आरपीएफच्या हवाली केल्याचे सांगण्यात आले़ 

टॅग्स :Solapurसोलापूरrailwayरेल्वेtheftचोरीPoliceपोलिस