सोलापूरजवळ रेल्वेचे डबे घसरले, जिवितहानी नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2018 18:57 IST2018-06-29T18:55:59+5:302018-06-29T18:57:51+5:30
होटगी स्टेशन (_ता़ उ़ सोलापूर) येथील बिर्ला सिमेंट कंपनीतून सिमेट वाहतुक करणारी चार रेल्वे डबे घसरले.

सोलापूरजवळ रेल्वेचे डबे घसरले, जिवितहानी नाही
सोलापूर : होटगी स्टेशन (_ता़ उ़ सोलापूर) येथील बिर्ला सिमेंट कंपनीतून सिमेट वाहतुक करणारी चार रेल्वे डबे घसरले.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, होटगी स्टेशन परिसरात असलेल्या बिर्ला सिमेंट कंपनीतून सिमेंटची रेल्वे ने वाहतुक केली जाते़ सिमेंट भरुन डबे जोडत असताना चार डबे कंपनीच्या गेट बाहेर औज रोड बाहेर मद्रास रेल्वे लाइन जवल आल्यावर रुळ घसरुन पडले़
यावेळी सुदैवाने रेल्वे प्रवासी करणारी कोणतीही गाडी मेन लाईनवरून येत नव्हती त्यामुळे कोणत्याही प्रकारची जिवित हानी झाली नाही़ परंतू यामुळे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे़ डबे घसरल्यानंतर रेल्वे प्रशासनाकडून सध्या डबे उचलण्याचे काम वेगाने चालू होते़
सविस्तर वृत्त थोड्याच वेळात़़़