Raichur-Vijayapur, Kalburgi-Solapur, Wadi-Solapur trains canceled | रायचूर-विजयपूर, कलबुर्गी-सोलापूर, वाडी-सोलापूर रेल्वेगाड्या रद्द

रायचूर-विजयपूर, कलबुर्गी-सोलापूर, वाडी-सोलापूर रेल्वेगाड्या रद्द

ठळक मुद्देसोलापूर-वाडी सेक्शनदरम्यान बहुतांश गाड्या शॉर्ट टर्मिनेट करण्यात आल्याकाही गाड्यांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आह़ेसोलापूर विभागावरून धावणाºया पॅसेंजर गाड्या रद्द

सोलापूर : मध्य रेल्वेच्यासोलापूर विभागातील तिलाटी रेल्वेस्थानकादरम्यान नॉनइंटरलॉकच्या कामासाठी रेल्वे प्रशासनाकडून १७ ते २० आॅक्टोबर या तीन दिवसांच्या कालावधीत ब्लॉक घेण्यात आला आहे़ या कामामुळे रायचूर-विजयपूर, कलबुर्गी-सोलापूर व वाडी-सोलापूर या रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्या आहेत़ याशिवाय अन्य गाड्यांच्या मार्गात बदल करण्यात आल्याची माहिती वरिष्ठ वाणिज्य मंडल प्रबंधक प्रदीप हिरडे यांनी ‘लोकमत’ शी बोलताना दिली.

मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागातील तिलाटी रेल्वेस्टेशनवर नॉनइंटरलॉकिंग कामाकरिता १७ ते २० आॅक्टोबर या कालावधीत सोलापूर विभागावरून धावणाºया पॅसेंजर गाड्या रद्द करण्यात आल्या असून, काही गाड्यांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आह़े सोलापूर-वाडी सेक्शनदरम्यान बहुतांश गाड्या शॉर्ट टर्मिनेट करण्यात आल्या आहेत़ दरम्यान, गाडी क्र. ५७१३४ रायचूर-विजयपूर पॅसेंजर ही गाडी कलबुर्गी स्थानकापर्यंत धावणार आहे़ हीच गाडी कलबुर्गी स्थानकावरून गाडी क्र. ५७१३३ विजयपूर-रायचूर पॅसेंजर म्हणून आपल्या निर्धारित वेळेत सुटेल. कलबुर्गी स्थानक आणि सोलापूर स्थानकादरम्यान गाडी क्र. ५७१३४ रायचूर-विजयपूर पॅसेंजर धावणार नाही. 

याशिवाय गाडी क्र. ५७१३३ विजयपूर- रायचूर पॅसेंजर सोलापूर स्थानकापर्यंत धावेल. सदर गाडी सोलापूर स्थानकावरून गाडी क्र. ५७१३४ रायचूर- विजयपूर पॅसेंजर म्हणून आपल्या निर्धारित वेळेत सुटेल. सोलापूर स्थानक आणि कलबुर्र्र्र्गी स्थानकादरम्यान गाडी क्र. ५७१३३ विजयपूर-रायचूर पॅसेंजर धावणार नाही. गाडी क्र. ५७६२८ कलबुर्र्र्र्गी -सोलापूर पॅसेंजर रद्द करण्यात आली आहे. तरी प्रवाशांनी गाड्यामध्ये परिवर्तन झाल्याची नोंद घ्यावी व आपला प्रवास सुनिश्चित करावा, असे आवाहन मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागाने केले आहे़ 

सोलापूर-फलकनुमा पॅसेंजर धावणार नाही
- कलबुर्र्र्र्गी स्थानकावरून गाडी क्र. ५७६५९ सोलापूर-फलकनुमा पॅसेंजर आपल्या निर्धारित वेळेत सुटेल. गाडी क्र. ५७६५९ सोलापूर-फलकनामा पॅसेंजर सोलापूर स्थानक आणि कलबुर्र्र्र्गी स्थानकादरम्यान धावणार नाही. गाडी क्र. ७१३०६ वाडी-सोलापूर डेमू कलबुर्र्र्र्गी स्थानकापर्र्यंत धावेल. सदर गाडी कलबुर्र्र्र्गी स्थानकावरून गाडी क्र. ७१३०१ सोलापूर-गुंटकल डेमू म्हणून आपल्या निर्धारित वेळेवर धावेल. गाडी क्र. ७१३०६ कलबुर्र्र्र्गी -सोलापूर स्थानकादरम्यान धावणार नाही आणि गाडी क्र. ७१३०१ सोलापूर-कलबुर्र्र्र्गी स्थानकादरम्यान धावणार नाही. 

Web Title: Raichur-Vijayapur, Kalburgi-Solapur, Wadi-Solapur trains canceled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.