शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

रहमानसाहेब प्रवचनातून विणतात सर्वधर्माचे धागे

By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2018 8:22 PM

दक्षिण सोलापूर तालुक्यातील औराद या गावचे रहमानसाहेब शेकूसाहेब सेतसंदी हे नाव सर्वांच्या परिचयाचे झाले आहे.

 सोलापूर - दक्षिण सोलापूर तालुक्यातील औराद या गावचे रहमानसाहेब शेकूसाहेब सेतसंदी हे नाव सर्वांच्या परिचयाचे झाले आहे.  लगतच्या कर्नाटक सिमेवरील जिल्ह्यांसह लातूर, उस्मानाबाद, तुळजापूर, पंढरपूरपर्यंत त्यांच्या अनोख्या कार्याची महती पोहचली आहे. स्वत:च्या मुस्लिम धर्माचे पालन करण्यासोबतच हिंदू धर्मग्रंथांचा अभ्यास असलेले आणि भागवताच्या माध्यमातून ज्ञानामृत पेरणारे रहमानसाहेब आपल्या कृतीतून आणि वाणीतून जातीधर्माच्या विटा तोडत सर्वधर्मसमभावाचे धागे विणत आहेत.

सोलापुरच्या गुरूवारपेठेतील शंकरलिंग देवालयात श्रावण समाप्तीनिमीत्त सोमवारी त्यांचे प्रवचन झाले. या निमीत्ताने त्यांच्याशी संवाद घडला. औराद येथील यशवंत विद्यालयातून प्रयोगशाळा सहाय्यक पदावरून निवृत्त झालेले ६६ वर्षांचे रहमानसाहेब गावोगावाहून येणाा-या निमंत्रणावरून प्रवचने देत फिरत असतात. बालपणी सोलापुरातील शिक्षणानंतर धर्मशास्त्र अभ्यासातील चिकित्सकवृत्ती वाढली. गावातील गंगाधर शहापुरे यांनी धार्मिक शिक्षण दिले. सुरूवातीला एक मुस्लिम मुलगा हिंदू धर्मग्रंथांचे अध्ययन करतो म्हटल्यावर अनेकांना आश्चर्य वाटले. पुढे गावच्या मंदिरातील रोजच्या प्रवचनाची जबाबदारी शहापुरे यांनी रहमानसाहेबांवर सोपविली. १९७३ पासून ते या कार्यात आहेत. पंचीकरण, विचार चंद्रोदय, विचार सागर, वृत्ती प्रभाकर हे त्यांचे आध्यात्मातील आवडीचे विषय! यासोबच रामायण, महाभारत, गीता, ज्ञानेश्वरी, अमृतानुभव, चांगदेव पासष्टी, हरिपाठ, शिवपाठ, दशउपनिषद, प्रस्थान गै यासह अनेक धार्मिक ग्रंथांचा त्यांनी अभ्यास केला आहे. मराठी, हिंदी, कन्नड या भाषेतून त्यांची रसाळ वाणी प्रवाहित होत असते. संतांच्या बोधवचनांतून समाजमने जागविण्याचे त्यांचे कार्य अव्यहत सुरू आहे.  रहमानसाहेब स्वत:च्या धर्माचरणानुसार मस्जिदमध्ये नमाज पढतात. कुराणावर प्रवचन करतात. रोजाही ठेवतात. या बरोबरच  मंदिरात जावून प्रवचने देतात. ग्रंथांचे पारायण करतात. लातूर, तुळजापूर, उस्मानाबादमध्ये तीन महिन्यातून सत्संग घेतात. आजवर एक हजार प्रवचनांचे कार्यक्रम त्यांनी केले आहेत. नेहमी शाकाहाराचे पालन करून पाचही एकादशी आणि उपवासही ते करतात. त्यांच्या या कार्यात कधीच धर्म आडवा आला नाही.

टॅग्स :Solapurसोलापूरnewsबातम्या