जातिवाचक शिवीगाळ करत मारहाण; चौघांविरुद्ध अ‍ॅट्रॉसिटीनुसार गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 04:48 IST2020-12-05T04:48:47+5:302020-12-05T04:48:47+5:30

याबाबत अधिक माहिती अशी, फिर्यादी महिला ही गुरुवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास आपल्या शेजारच्यांसोबत घरासमोरील कट्ट्यावर बसली होती. तेव्हा ...

Racial slurs; Atrocities against the four | जातिवाचक शिवीगाळ करत मारहाण; चौघांविरुद्ध अ‍ॅट्रॉसिटीनुसार गुन्हा

जातिवाचक शिवीगाळ करत मारहाण; चौघांविरुद्ध अ‍ॅट्रॉसिटीनुसार गुन्हा

याबाबत अधिक माहिती अशी, फिर्यादी महिला ही गुरुवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास आपल्या शेजारच्यांसोबत घरासमोरील कट्ट्यावर बसली होती. तेव्हा संशयित आरोपी शकिला हाफिज शेख ही फिर्यादी महिलेला उद्देशून ‘तुम्ही इथे का बसलात, ही जागा तुमच्या बापाची आहे का’, असे म्हणत अश्लील व जातिवाचक शिवीगाळ करू लागली. सोबतच मी पत्रकार आहे, ही माझी जागा आहे. आतापर्यंत कोणीही माझे काहीही करू शकले नाही. तुम्ही काय करणार, तुम्हा सर्वांना जेलमध्ये घालते, असे धमकावले. दरम्यान संशयित आरोपीचा पती हाफिज शेख व मुली झेनिजहाँ, झवेरिया यांनी फिर्यादी महिलेला दगडाने मारहाण करत अंगावर कचरा टाकला. मुलींनीही जातिवाचक शिवीगाळ करत यापुढे तुम्ही इथे कसे राहता आम्ही पाहतो, असे धमकावत मारहाण केली, अशी फिर्याद पीडित महिलेने सदत बाजार पोलिसांत दिली. अधिक तपास सुरू आहे.

Web Title: Racial slurs; Atrocities against the four