शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
2
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
3
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
4
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
5
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
6
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
7
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
8
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
9
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
10
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
11
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
12
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
13
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
14
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
15
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
16
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
17
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
18
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
19
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
20
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा

राम मंदिर देशाच्या अस्मितेचा प्रश्न : संजय राऊत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2018 12:28 PM

पंढरपुरात होणाऱ्या उद्धव ठाकरे यांच्या सभेच्या स्थळाची केली पाहणी

ठळक मुद्देशिवसेनेच्या पाठिंब्यामुळेच भाजप सरकार सुस्थितीतपंढरपुरातील उद्धव ठाकरे यांची सभा ऐतिहासिक होणार

पंढरपूर : राम मंदिर हा कोणत्या पक्षाचा किंवा राजकीय विषय नव्हे तर तो देशाच्या आस्मितेचा विषय आहे, असे प्रतिपादन शिवसेनेचे खा़ संजय राऊत यांनी केले. 

२४ डिसेंबर रोजी पंढरपुरातील चंद्रभागा मैदानावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची हिंदू महासभा होणार आहे़ त्यानिमित्त मैदानाची व तयारीची पाहणी करण्यासाठी ते शुक्रवारी पंढरपुरात आले होते़ तेव्हा शासकीय विश्रामगृह येथे पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते. 

राममंदिरासाठी उद्धव ठाकरे यांनी आयोध्यात सभा घेतली़ बाहेरील राज्यातही चांगला प्रतिसाद मिळाला़ या सभेची देशाने दखल घेतली़ त्यानंतर दक्षिण काशी समजल्या जाणाºया पंढरपुरात  महासभा होणार आहे़ ही सभा ऐतिहासिक आणि न भूतो न भविष्यती अशीच होईल़ मैदानाची पाहणी केल्यानंतर मैदान मोठे तर आहेच पण तेही कमी पडेल, असे वाटते़ शिवसेनेला एक धार्मिक अधिष्ठान लाभलेले आहे़ त्यामुळे राममंदिर हा हिंदूच्या अस्मितेचा विषय आहे़ हे मंदिर व्हावे ही शिवसेनेची भूमिका आहे. पंढरपूरचा पांडुरंग हा कष्टकरी, शेतकरी, कामगार, गोरगरीबांवा देव आहे़ मुंबईतही बहुसंख्य कामगार आहेत़ देवांचे आणि कष्टकºयाचे आशीर्वाद घेऊन निवडणुकीसाठी सज्ज राहणार आहोत़ सेना सत्तेत असली तरी शेतकºयांच्या प्रश्नावर नेहमीच आक्रमक राहिली आहे़ सेनेच्या दबावामुळेच आता पंतप्रधान हेही ४ लाख कोटी शेतकºयांची कर्जमाफी देण्याच्या तयारीत आहेत़ त्यामुळे शेतकºयांना दिलासा मिळेल़ झोपलेल्या कुंभकर्णाला जागे करण्यासाठी शिवसेना सतर्क झाली आहे़ नुकतेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपा-सेनेची युती होणार असल्याचे जाहीर केले़ त्यावर बोलताना संजय राऊत म्हणाले, ते राज्याचे मुख्यमंत्री आहेत़ शिवसेनेच्या पाठिंब्यामुळे हे सरकार सुस्थितीत चालू आहे़ त्यांना विचार करूनच बोलावे लागते़तीन राज्यांच्या निवडणुकीत काँग्रेसची सत्ता आली विशेषत: मध्यप्रदेशात सेनेच्या उमेदवारांमुळे भाजपाचे काही उमेदवार थोड्याफार मतांनी पराभूत झाले़ यावर बोलाताना संजय राऊत म्हणाले, कोणाला पाडण्यासाठी आम्ही लढलो नाही तर शिवसेनेचा विस्तार अन्य राज्यातही व्हावा, म्हणून आम्ही उमेदवार उभे केले होते. 

टॅग्स :SolapurसोलापूरSanjay Rautसंजय राऊतPandharpurपंढरपूर