Quarrels between two neighbors in Shelgi over pottery; Accused of assault with sword | शेळगीतील दोन शेजाºयांची भांडणे कुंभारवेशीत; तलवारीने हल्ला केल्याचा आरोप

शेळगीतील दोन शेजाºयांची भांडणे कुंभारवेशीत; तलवारीने हल्ला केल्याचा आरोप

ठळक मुद्देयाप्रकरणी जोडभावी पेठ पोलिस ठाण्यात तक्रार देण्यात आली असून गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू सोमवारी सकाळी एका शेजाºयाने दुसºया शेजाºयावर तलवारीने हल्ला केल्याचा आरोप असून याची नोंद जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात झाली

सोलापूर : शिवगंगा नगर शेळगी येथील घराशेजारी राहणाºया दोघांची भांडणे कुंभार वेशीतील दुकानासमोर झाल्याने तणाव निर्माण झाला होता. दारात जनावरे लावण्याच्या कारणावरून वाद निर्माण झाला. सोमवारी सकाळी एका शेजाºयाने दुसºया शेजाºयावर तलवारीने हल्ला केल्याचा आरोप असून याची नोंद जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात झाली आहे. 

राजू हांडे (वय २७, रा. शिवगंगा नगर, शेळगी) याचा राहत्या घरा समोर जनावरांचा गोटा आहे. गोट्यात जनावरे का बांधत होता, त्यामुळे शेजारी राहणाºया युवराज यलशेट्टी याने हरकत घेतली. तुझ्या जनावरांमुळे  घाण होते, माशा आमच्या घरापर्यंत येतात, इथे जनावरे बांधण्याचे बंद कर असे राजू हांडे म्हणत होता. यावरून रविवारी रात्रीच्या सुमारास दोघांमध्ये वाद झाला होता. स्थानिक लोकांनी मध्यस्थी करून हा वाद मिटवला होता, मात्र सोमवारी सकाळी राजू हांडे व त्याचा मित्र दोघे युवराज यलशेट्टी याचे दुकान असलेल्या कुंभार वेस या ठिकाणी गेले.

राजू हांडे याने युवराज येलशेट्टी याला तू माझ्या विरोधात लोकांना भडकावतो तो का? असा जाब विचारून शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. यावरून दोघांमध्ये वाद पेटला त्यात राजू हांडे याने युवराज यलशेट्टी याला मारहाण केली. मारहाणीत युवराज यलशेट्टी हा जखमी झाला. त्यानंतर राजू हांडे व त्याचा मित्र तिथून निघून गेले. याप्रकरणी जोडभावी पेठ पोलिस ठाण्यात तक्रार देण्यात आली असून गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. 
 

Web Title: Quarrels between two neighbors in Shelgi over pottery; Accused of assault with sword

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.