शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला पराभव दिसू लागलाय, प्रचंड मताधिक्यांनी १०० टक्के विजयी होणार”: विशाल पाटील
2
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
3
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
4
‘मुलीला वडिलांच्या संपत्तीत ५० टक्के अधिकार, हा सरकारचा कायदा’, सुप्रिया सुळेंचा जानकरांना टोला 
5
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
6
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
7
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
8
IPL 2024 CSK vs PBKS : पंजाबने टॉस जिंकला! ऋतुराजची मिश्किल टिप्पणी; अखेर सँटनरची एन्ट्री
9
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
10
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
11
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
12
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
13
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
14
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
15
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
16
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
17
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
18
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
19
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
20
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट

'कोरोना'सह इतर विषाणूंवर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात संशोधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 03, 2020 11:32 AM

सोलापूर विद्यापीठातील प्रयोगशाळेसाठी सिव्हील हॉस्पीटलचेही सहकार्य : पहिल्या टप्प्यात १० लाखांचा निधी

ठळक मुद्देभविष्यात मायक्रोबायोलॉजी या विषयात अनेक संधी उपलब्ध होणारयेत्या काळात इतर मंडळाची मान्यता घेऊन शासनाकडे प्रस्ताव पाठवणारराज्यात सोलापूर विद्यापीठाचा नावलौकिक वाढतोय

सोलापूर : जगभरातील शास्त्रज्ञ हे कोरोना विषाणूवर संशोधन करत असताना सोलापुरातही अशा प्रकारचे संशोधन होणार आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात कोरोनासह इतर विषाणूवर संशोधन करण्यात येणार आहे. विद्यापीठाच्या मॅनेजमेंट कौन्सीलने हा प्रस्तावास मान्यता दिली आहे.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात यंदाच्या शैक्षणिक वर्षात लाईफ सायन्स संकुल सुरु करण्यात येणार आहे. या संकुलात एमएस्ससी मायक्रोबायोलॉजी (सूक्ष्मजीवशास्त्र) अभ्यासक्रम सुरु करण्यात येणार आहे. यासाठीची तयारी सुरु करण्यात आली आहे. एक सप्टेंबरपासून या अभ्यासक्रमास सुरुवात होणार आहे.

सध्या कोरोना विषाणू जगभर पसरला असून आता तसेच भविष्यात अशा विषाणूवर संशोधन करण्याची जास्त गर आहे. हे ओळखून मॅननेजमेंट कौन्सीलच्या बैठकित या विषयाला एकमताने मंजुरी देण्यात आली. ही बैठस एप्रिल महिण्यात आॅनलाईन पद्धतीने झाली होती. या बैठकीत १० लाखांच्या पहिल्या टप्प्यातील निधीस मान्यता देण्यात आली.

येत्या काळात इतर मंडळाची मान्याता घेऊन शासनाकडे या अभ्यासक्रमासाठी परवानगी घेण्यात येणार आहे. विषाणू तसेच इतर संशोधनासाठी एक प्रयोगशाळा उभारण्यात येणार आहे. ही मायक्रोबायॉलॉजी प्रयोगशाळा कशी असावी याच्या पाहणीसाठी विद्यापीठातील तज्ञांनी छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय (सिव्हील), डॉ. वैशंपायन स्मृती शासकिय वैद्यकिय महाविद्यालयाच्या प्रयोगशाळेस भेट दिली. प्रयोगशाळा तंत्रज्ञ व प्राध्यापक यांच्या भरतीसाठी जाहीरात देण्यात येणार आहे.------------------------------------–पुण्या-मुंबईतील तज्ञांची मदतविद्यापीठात प्रयोगशाळा उभी करण्यासाठी पुणे-मुंबई येथील तज्ञांशी सध्या चर्चा सुरु आहे. तसेच पुणे येथे असणाºया नॅशनल इन्स्टीट्युट आॅफ वायरॉलॉजी (राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था) यांचीही मदत घेण्यात येणार आहे. टप्प्याटप्याने प्रयोगशाळा उभी करत त्यासाठी लागणारे आवश्यक साहित्याची खरेदी करण्यात येणार आहे. यासोबतच प्रयोगशाळा उभारणीसाठी डॉ. वैशंपायन स्मृती शासकिय वैद्यकिय महाविद्यालय व कुुंभारी येथील अश्विनी वैद्यकिय महाविद्यालय हे सहकार्य करत आहेत.------------------------------------भविष्यात मायक्रोबायोलॉजी या विषयात अनेक संधी उपलब्ध होणार आहेत. या दृृष्टीकोनातून या शैक्षणिक वर्षात मायक्रोबायोलॉजी अभ्यासक्रम सुरु करत आहोत. प्रयोगशाळा उभारणीसाठी विविध ठिकाणी पाहणी करण्यात आली आहे. ज्या तज्ञांनी यापुर्वी प्रयोगशाळा उभारली त्यांची मदत घेण्यात येत आहे. विद्यापीठात सुरु होणाºया प्रयोगशाळेसाठी शासनाची मान्यता घेण्याची प्रकि या सुरु करण्यात आली आहे. या प्रयोगशाळेतून दर्जेदार संशोधन होईल.- डॉ. मृणालिनी फडणवीस, कुलगुरु, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ-------

टॅग्स :Solapurसोलापूरcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसSolapur University, Solapurसोलापूर विद्यापीठ, सोलापूर